तोडलेले प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रेयसीशी अश्लील चाळे

राजेंद्रने तिला वारंवार मदत करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढले
Crime
CrimeSakal
Updated on

नागपूर : तोडलेले प्रेमसंबंध (love affair) कायम ठेवण्यासाठी महिलेवर दबाव टाकून प्रियकराने भररस्त्‍यात अश्‍लील चाळे (Molestation of woman) केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजेंद्र ऊर्फ टिन्नू गुरम (३२) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय महिला आणि राजेंद्र गुरम हे एकाच वस्तीत राहतात. काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी एकटी असलेल्या महिलेवर राजेंद्रची नजर गेली. सुरुवातीला त्याने तिला मदत करीत मैत्री केली. तिच्या घरी ये-जा सुरू केली. पती नसल्यामुळे कुण्यातरी पुरुषाचा सहारा असावा म्हणून तिने राजेंद्रशी मैत्री केली.

Crime
दिल्लीत पुन्हा निर्बंधांचे दिवस! मुख्यमंत्र्यांकडून यलो अलर्ट जाहीर

राजेंद्रने तिला वारंवार मदत करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांचे प्रेमसंबंध (love affair) जुळले. मात्र, राजेंद्रचा विचित्र स्वभाव पाहून महिला त्रस्त झाली होती. रात्री-बेरात्री तो घरी येऊन वाद घालत होता. तसेच तिला विचित्र मागणी करीत होता. त्यामुळे कंटाळून तिने त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. तरीही तो संबंध कायम ठेवण्यासाठी तिला त्रास देत होता. तिच्या घरी येऊन प्रेमाची मागणी करीत होता.

राजेंद्रचा शोध सुरू

ती कामावर जात असताना राजेंद्रने रस्त्यात अडविले. तिचा हात पकडून ओढणी ओढून अश्‍लील चाळे करीत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून फरार झालेल्या राजेंद्रचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.