महाविकास आघाडी नव्हे टोळी सरकार; चंद्रकांत पाटील

लक्ष विचलित करण्याची धडपड
Chandrakant Patil
Chandrakant Patilsakal
Updated on

नागपूर : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे. रोज काही तरी खुसपट उकरून काढतात आणि मूळ मुद्यावर दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची धडपड या सरकारची सुरू असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते विदर्भात आले होते. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. बंड्यातात्या कराडकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दारूच्या निर्णयामुळे व्यथित झालो, म्हणून असे बोललो असे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असनाता त्यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.

Chandrakant Patil
अभ्यासाचा तणाव बेतला जीवावर... १८ वर्षांच्या तरुणीने घेतला गळफास!

काही कराण नसताना विषय इतका गंभीर नसतानाही चर्चा घडवून आणली जात आहे. घोटाळे, भ्रष्टाचार, ईडीची कारवाई, वाईनच्या विक्रीला किराणा दुकानातून विक्री करण्यास दिलेली परवानगी याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे याकरिता हा खटाटोप सुरू आहे. सत्तेवरून खेचून काढत नाही तोपर्यंत सत्ता भोगायची हे या सरकारचे धोरण आहे. इतके आरोप होऊनही यांना काहीच वाटत नाही. निदान आम्ही आहोत म्हणून सरकार ताळ्यावर तरी आहे. नाहीतर या सरकारने काय केले असते याचा काही नेम नसता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. किरीट सोमय्या जे बोलतात ते करतात आणि जेव्हा ते म्हणतात त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असतात. सुजित पाटकरच्या कंपनीत संजय राऊत आणि त्यांच्या मुलीची भागीदारी आहे, तशा बातम्या आल्या आहेत. मी एवढेच म्हणेन की किरीट सोमय्या यांच्याकडे आणखी बरेच काही आहे.

Chandrakant Patil
लग्नाआधी आत्महत्या; बस्ता बांधायला आलेले पाहुणे अंत्ययात्रेत झाले सहभागी

अमृता काय म्हणाल्या माहीत नाही

अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास पाटील यांनी टाळले. अमृता फडणवीस काय म्हणाल्या मला माहीत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यावर मी बोलणार नाही, असे बोलून त्यांनी विषय संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.