Vardha Monsoon : अतिवृष्टीने अडीच लाख शेतकऱ्यांना फटका : शेतकऱ्यांना मिळणार २३७ कोटी

Vardha Monsoon : यंदाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या २.५ लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने २३७ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जून-जुलै महिन्यातील नुकसान भरपाईसाठी ही मदत दिली जाणार आहे.
Vardha Monsoon
Vardha Monsoonsakal
Updated on

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या दडीनंतर झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. अनेकांची शेती खरडून गेली. नुकसानामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणवले. पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकऱ्यांकडून शासनाला मदतीची मागणी झाली.

मागणीला शासनाने होकार देत तीन हेक्टरपर्यंत नुकसानापोटी मदत जाहीर केली आहे. मदतीसाठी शासनाने २३७ कोटी सात लाख १३ हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्याचा लाभ राज्यातील दोन लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानापोटी विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावापैकी तब्बल एक लाख ५९ हजार ३५५.१३ हेक्टरवरील नुकसान शासनाकडून ग्राह्य धरण्यात आले आहे. नुकसान भरपाई जाहीर करताना जून आणि जुलै या दोन महिन्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यात ऑगस्ट महिन्याचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. खरिपात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत किमान रब्बी हंगामाच्या तोंडावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

एका हंगामातील नुकसानाची मदत दुसऱ्या हंगामात शेतकऱ्यांना देय होईल या नियमानुसार निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागपूर विभाग

  • नुकसान (हेक्टर) ः १,२४,९९०.३३

  • शेतकरी संख्या ः १,८९,८४३

  • जाहीर मदत (लाखात) ः १८,७२९.९६

अमरावती विभाग

  • नुकसान (हेक्टर) ः ३४,३३१.८४

  • शेतकरी संख्या ः २७,५९७

  • जाहीर मदत (लाखात)ः ३३२०.३५

पावसाचा कहर सुरूच

खरीपात झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यात शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक भागात मुसळधार तर काही भागात संततधार पाऊस आजही सुरूच आहे. या पावसामुळे कसेबसे हाती येणारे पीक जाण्याचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यात घोंघावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.