भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस फडकवणार झेंडा? लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु, समन्वयकांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली असून, रविवारी राज्यातील ४६ लोकसभा समन्वयकांची यादी जाहीर केली.
Congress
Congressesakal
Updated on

Loksabha Election: लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली असून, रविवारी राज्यातील ४६ लोकसभा समन्वयकांची यादी जाहीर केली. यादीमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी चांदुरचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे, तर रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

येत्या काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसनेही कंबर कसली असून, कामास सुरवात केली आहे. यापूर्वीच काँग्रेसचे प्रभारीपदाची धुरा चेनीताला यांच्याकडे सोपविली आहे. याशिवाय मतदारसंघनिहाय इच्छुकांची नावेही मागविण्यास सुरूवात केली आहे.

सध्या नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता आहे. मात्र, येत्या काळात या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला बळकटी देण्याच्या उद्देशाने या दोन्ही समन्वयकांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. (Latest Marathi News)

याशिवाय पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी नाना गावंडे, वर्धेसाठी डॉ. नितीन राऊत, चंद्रपूरसाठी जुन्या फळीतील डॉ. सतीश चतुर्वेदी आणि गडचिरोलीसाठी पदवीधर प्रवर्गातील आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचीही समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Congress
MPSC Exam News : समाजकल्याणची भरती रखडली, सात महिन्यानंतरही परीक्षेची तारीख नाहीच; विद्यार्थी हवालदिल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.