Corona Update: एम्समध्ये आढळला जेएन-१ चा रुग्ण! तिघांना बाधा; आतापर्यंत २१ रुग्ण

कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चे राज्यात १३९ रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले असून, त्यापाठोपाठ मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे.
Nagpur Corona Updates new 6489 corona patients and 64 deaths today
Nagpur Corona Updates new 6489 corona patients and 64 deaths today
Updated on

Nagpur Covid News: कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चे राज्यात १३९ रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले असून, त्यापाठोपाठ मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत जेएन.१चे २१ रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी (ता. ७) कोरोनाच्या तीन बाधितांसह जेएन.१च्या एका बाधिताची भर पडली असून, एम्सच्या तपासणीतून हा रुग्ण आढळून आला.

राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाणे येथे रुग्ण आढळले होते. मात्र राज्यात जेएन.१ पुणे मुंबईनंतर नागपुरात २० रुग्ण आढळून आले आहेत. मात्र सर्वच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या कोरोनाचे नागपुरात ५० सक्रिय रुग्ण आहेत. तर उपराजधानीतही जेएन.१ चा आकडा फुगत आहे. रविवारी एम्समधील व्हायरलॉजी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या जिनोम सिक्वेंसिंच्या नमुन्यात एक जेएन.१ चा रुग्ण आढळला. एम्सचे संचालक डॉ. हनुमंतराव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनत डॉ. मीना मिश्रा यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील विषाणूच्या तुलनेत जेएन.१ घातक नसल्यामुळे नागपूरकरांना कोरोना वाढत असूनही चिंता नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार किमान काही प्रमाणात काळजी घेतली तर कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करू शकतो. कोरोनासदृश लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले. (Latest marathi news)

Nagpur Corona Updates new 6489 corona patients and 64 deaths today
Kangana Ranaut Post : लोकसभेच्या तयारीचा काय संबंध? जावेद अख्तरांपाठोपाठ कंगनाची 'अ‍ॅनिमल' वर जळजळीत टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.