Cricketnama:काँग्रेस वॉरियर्सने जिंकली ‘क्रिकेटनामा’ ट्रॉफी! फायनलमध्ये एकनाथ शिंदे गटाला पराभूत करून पटकावले विजेतेपद

प्रकाशझोतात खेळल्या गेलेल्या चुरशीच्या फायनलमध्ये काँग्रेस वॉरियर्सने एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना रायडर्सचा १० धावांनी पराभव केला.
Cricketnama:काँग्रेस वॉरियर्सने जिंकली ‘क्रिकेटनामा’ ट्रॉफी! फायनलमध्ये एकनाथ शिंदे गटाला पराभूत करून पटकावले विजेतेपद
Updated on

Sarkarnama's Cricketnama Nagpur: राजकीय नेत्यांच्या फटकेबाजीने रंगलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’तर्फे आयोजित दुसऱ्या सीझनमधील ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेत नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस वॉरियर्सने विजेतेपद पटकावून 'चॅम्पियन' होण्याचा बहुमान प्राप्त केला. प्रकाशझोतात खेळल्या गेलेल्या चुरशीच्या फायनलमध्ये काँग्रेस वॉरियर्सने एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना रायडर्सचा १० धावांनी पराभव केला.

मेकोसाबाग परिसरातील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीतील मेथॉडिस्ट हायस्कूलच्या श्यालोम मैदानावर मंगळवारी संपलेल्या या स्पर्धेतील विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या काँग्रेस वॉरियर्सने २ बाद ८१ धावा केल्या.

शिवसेनेकडून पोलॉर्ड नाजवा यांनी नाबाद ५१ धावा काढून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याअगोदर, झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस वॉरियर्सने एनसीसी लेजंड्स संघाचा, तर दुसऱ्या लढतीत शिवसेना रायडर्सने (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून ग्रँड फायनलमध्ये धडक दिली होती.

नाना पटोले व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 'सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. नीलेश नातू व आकाश मांजरेकर यांनी सूत्रसंचालन व सामन्यांचे समालोचन केले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या एकूण दहा संघांनी सहभाग नोंदविला.(Latest Marathi News)

आमदार सिद्दीकींचे षटक ठरले 'टर्निंग पाॅईंट'

काॅंग्रेस वाॅरियर्सचे खेळाडू आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना रायडर्सविरुद्ध दुसऱ्या षटकात हॅट्रीक घेतली. प्रवेश असुदानी, मन्नू जोहर, अमन खालसा या तीन फलंदाजांना बाद केले. हे षटक सामन्याचे 'टर्निंग पाॅईंट' ठरले. त्यानंतरच काॅंग्रेस वाॅरियर्सने सामन्यावर पकड मजबूत केली.

Cricketnama:काँग्रेस वॉरियर्सने जिंकली ‘क्रिकेटनामा’ ट्रॉफी! फायनलमध्ये एकनाथ शिंदे गटाला पराभूत करून पटकावले विजेतेपद
Parliament Attack 2001: बावीस वर्षांपूर्वी संसदेवरील हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी 13 तारीखच का निवडली होती?

जिंकताच थिरकले नाना पटोले

काँग्रेसच्या टीमने ‘क्रिकेटनामा’ चषक जिंकल्यानंतर मैदानात जल्लोष सुरू झाला. त्यावेळी बाबा सिद्दीकी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीही डीजेच्या तालावर फेर धरत आनंद व्यक्त केला.

समर्थकांनी केले 'चिअरअप'

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील राजकीय नेत्यांनी दुसऱ्याही दिवशी मैदानावर तुफान फटकेबाजी करत उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. यावेळी समर्थक क्रिकेटप्रेमींनी सामन्यादरम्यान आपापल्या संघांना 'चिअरअप' करून सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

संघाने दिले शरद पवारांना 'बर्थ डे गिफ्ट'

दुसऱ्या दिवसाच्या सामन्यांची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघाने (एनसीपी) नोंदविलेल्या सुखद निकालाने झाली. एनसीपीने पहिल्याच लढतीत टीम मनसेचा पराभव करून शरद पवारांना अविस्मरणीय 'बर्थ डे गिफ्ट' देत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. अटीतटीच्या ठरलेल्या ‘नॉक आऊट’च्या दुसऱ्या सामन्यात सरपंच टायटन्स संघाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार संघावर विजय मिळवून आगेकूच केली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या लढतीत काँग्रेसने शिवसेना उद्धव ठाकरे गटावर ३६ धावांनी विजय नोंदविला.

या सामन्यात प्रेक्षकांना सिद्दीकी पितापुत्र व वजाहत मिर्झा यांची जादू पाहायला मिळाली. अभिषेकच्या हॅट्ट्रिकने गाजलेल्या अन्य एका सामन्यात एनसीसी (एपी) लॉयन्स संघाने मनसे चॅलेंजर्सचा ३१ धावांनी पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतरच्या लढतीत सरपंचांचे तगडे आव्हान पेलताना शिवसेनेच्या टीमची कसरत लागली. या रोमहर्षक सामन्यात शिवसेनेने अखेरच्या क्षणी बाजी मारत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. (Latest Marathi News)

Cricketnama:काँग्रेस वॉरियर्सने जिंकली ‘क्रिकेटनामा’ ट्रॉफी! फायनलमध्ये एकनाथ शिंदे गटाला पराभूत करून पटकावले विजेतेपद
Parliament Security Breach : लोकसभेतील घुसखोरी प्रकरणानंतर आता नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणं केलं बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.