Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टीका करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उद्या मंगळवारी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वसंतराव देशपांडे सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली.
फडणवीस यांनीच २०१४च्या निवडणुकीच्यावेळी युतीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि हिंदुत्वाशी गद्दारी तसेच फडणवीस हे नागपूरला कंलक असल्याचा आरोप केला. कंलक हा शब्द भाजपच्या नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. या विरोधात व्हेरायटी चौकात सकाळी १० वाजता शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजपच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
गडकरींचीही ट्विट करून नाराजी
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या भाषेवर नितीन गडकरी यांनीही ट्विट करून नाराजी व्यक्त केली. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आपली नाराजी दर्शवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.