Mahajyoti: ओबीसी विभागासाठी प्रथमच ३,३७७ कोटींची विक्रमी तरतूद! महाज्योतीसाठी २६९ कोटी, अतुल सावेंनी दिली माहिती

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मिळाल्याची इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
Mahajyoti: ओबीसी विभागासाठी प्रथमच ३,३७७ कोटींची विक्रमी तरतूद! महाज्योतीसाठी २६९ कोटी, अतुल सावेंनी दिली माहिती

Mahajyoti Scholarship for OBC: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मिळाल्याची इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

ओबीसी महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सामाजिक न्याय भवन येथे अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार परिणय फुके, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, शेषराव येलेकर, शरदराव वानखेडे, सुभाष घाटे, दिनेश चोखारे, रामदास कामडी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

त्यांनी सांगितले की, २०२३-२४ च्या योजनांसाठी ७८७३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. ओबीसी विभाग स्थापन झाल्यानंतर एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३०८१ कोटी अधिक आहेत. या निधीतून मोदी आवास योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद आहे. (Latest Marathi News)

महाज्योतीसाठी २६९ कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी १५८ कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी ५६ कोटी, अमृत संस्थेसाठी १५ कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ११९२ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगासाठी ३६० कोटी, ओबीसी व व्हीजेएनटी महामंडळासाठी २० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना शैक्षणिक व सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.

Mahajyoti: ओबीसी विभागासाठी प्रथमच ३,३७७ कोटींची विक्रमी तरतूद! महाज्योतीसाठी २६९ कोटी, अतुल सावेंनी दिली माहिती
Censor Board New CEO: रविंद्र भाटकरांवरील कारवाईनंतर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बदलले; स्मिता वत्स यांच्याकडे जबाबदारी

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहीर केलेली ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्यात येतील. याठिकाणी व्यावसायिकसोबत अव्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. महाज्योती, सारथी आदी संस्थाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यात येईल असे श्री. सावे यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Mahajyoti: ओबीसी विभागासाठी प्रथमच ३,३७७ कोटींची विक्रमी तरतूद! महाज्योतीसाठी २६९ कोटी, अतुल सावेंनी दिली माहिती
मुस्लिम धर्मातही ज्योतिषशास्त्राचे पंडित! बिस्मिल्ला पिंजारी 30 वर्षांपासून पाहतात मुहूर्त अन् कुंडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com