चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुकर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्राला ४०१ कोटीचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती मुनगंटीवार यांना दिली.