HRCT स्कोर होता २३ तरीही जिद्दीनं केली कोरोनावर मात; सकारात्मक ऊर्जेचा परिणाम

HRCT स्कोर होता २३ तरीही जिद्दीनं केली कोरोनावर मात; सकारात्मक ऊर्जेचा परिणाम
PASIEKA
Updated on

टेकाडी (जि. नागपूर ) : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) रुग्णाला शिस्त,संयम आणि रुग्णाचा सकारात्मक दृष्टिकोन (Positive Attitude) त्याला ठणठणीत बरा करू शकतो मग रूग्णालय कुठलंही असो त्याने कसलेही मानसिक दडपण न घेता डॉक्टरांचा सल्ला आणि स्वतःची काळजी घेतल्याने कोरोनावर सहज विजय मिळवु शकतो अशी सहज गोष्ट सांगून गेले २३ चा एचआरसीटी स्कोर (HRCT score) असलेले कांद्री येथील ४७ वर्षीय गुरुदेव चकोले, प्राणवायूची पातळी (Standard Oxygen Level) खालावल्यांतर अनेक रुग्णालयांनी व्हेंटिलेटरची गरज सांगितली तिथेच स्थानीय जवाहर लाल नेहरु रुग्णालयात निव्वळ ऑक्सिजन, डॉक्टरांच्या यशस्वी उपचाराने त्यांना कोरोनामुक्त केले आज आपल्या कुटूंबासोबत त्यांनी लग्नाचा २३ वा वाढदिवस आनंदाने साजरा केला. (Man cured from Corona though HRCT score is 23)

HRCT स्कोर होता २३ तरीही जिद्दीनं केली कोरोनावर मात; सकारात्मक ऊर्जेचा परिणाम
कुलरमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या काय आहे डॉक्टरांचं मत

गुरुदेव चकोले यांनी स्वतःचे ०३ एप्रिल रोजी लसीकरण करून घेतले,त्यानंतर येणार ताप दगा देऊन गेला ताप कमी होत नसल्याने तब्बल नऊ दिवसांनी १२ एप्रिल रोजी स्वतःची कोव्हिडं चाचणी करून घेतली असता ते बाधित असल्याचे निष्पन्न झाले,आरोग्य केंद्राच्या औषधांवर त्यांनी पाच दिवस घरीच काढले त्रास कमी न होता तो आणखी तीव्रतेने वाढला कुटूंबाच्या मनात धास्ती भरली, खासगी रुग्णालयात धाव घेत सिटी स्कॅन केले एचआरसीटी स्कोर २३ चा आला नंतर शरीरातील प्राणवायू ही कमी व्ह्यायला सुरवात झाली मग झाली खासगी रुग्णालयायाची धावपड सूरु डॉक्टराणी त्यांना व्हेंटिलेटर लागत असल्याचे सांगितले कुठे बेड आणि व्हेंटिलेटर मिळत नव्हते तर कुठे डॉक्टर सिटी स्कोर पाहून उपचाराला नकार देत होते.

अखेर ते खंबीर झाले आणि कांद्री स्थित जवाहरलाल नेहरू रुग्णालयात २० एप्रिल रोजी ते दाखल झाले डॉक्टराणी उपचाराला सुरवात केली चकोले यांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला कुठलेही व्हेंटिलेटर न लावता अखेर चकोले हे २९ एप्रिल रोजी ठनठणीत झाले,त्यांनी निगेटीव्ह विचारांपासून स्वतःला दूर ठेवलं मित्र,कुटूंब यांचे सकारात्मक फोन ते घेऊ लागले काही दिवसांनी सर्व लक्षणे बंद झाली आणि गुरुदेव चकोले यांनी कोरोनावर चुटकीत मात केली.

HRCT स्कोर होता २३ तरीही जिद्दीनं केली कोरोनावर मात; सकारात्मक ऊर्जेचा परिणाम
... अन् कित्येक वर्षानंतर विहिरीला लागले झरे; मेळघाटातील बिहाली गाव झालं टॅंकरमुक्त

प्राणवायू खालावल्याने एकाच दिवशी पाच रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी जवाहरलाल नेहरू रुग्णालय अनेकांच्या रडारवर आले होते,मात्र नागपूर सारख्या ठिकाणी पर्याय नसल्याने अनेक रुग्णांवर याच रुग्णालयात सकारात्मक उपचार होऊन ते सुखरूप घरी परतले कदाचित तो काळ वाईट असेल जेव्हा अपघात घडला पण सध्या रुग्णालयात असलेली टीम त्यांच्या कडे आहे त्या व्यवस्थेत रुग्णावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करीत आहेत हेही तितकेच खरे.

(Man cured from Corona though HRCT score is 23)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.