नागपूर : नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला होता. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसादही दिला. मात्र आज कर्फ्यू उघडताच नागपुरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.
नागपूरच्या बेसा येथील कल्याणेश्वर नगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांचा थरकाप उडाला आहे. पत्नीचा प्रियकर असल्याने त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले त्यामुळे झालेल्या वादात पतीने पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांचीही गळा चिरून हत्या केली आहे.
मृत किरण कुवरलाल बरमैया (29) असे मृत पावलेल्या पत्नीचे नाव आहे. किरण यांचे शिवा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भारत बरमेया याला होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे.
वारंवार विरोध दर्शवूनही किरणने पती कुंवरलाल भारत बरमैया याचे ऐकले नाही. अखेर वाद टोकाला गेला आणि कुंवरलाल भारत बरमैया (40) याने कुऱ्हाडीने गळा चिरून पत्नी किरण कुवरलाल बरमैया (29) आणि तिचा प्रियकर शिवा या दोघांचीही हत्या केली.
या प्रकारांतील आरोपीला अवघ्या काही तासात पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवले आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.