नागपूर : वर्षभरापूर्वी भंडारा जिल्ह्यातून (Bhandara district) नागपूरला (Nagpur district) पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या रवींद्र बोरकर यांनी रेशन कार्डचीही (Ration card procedure) नागपुराला बदली केली. त्याला कार्डही मिळाले. मात्र, सहा महिन्यापासून त्याच्या कार्डला ऑनलाइन (Ration Card Online) मान्यता मिळत नसल्याने नागपूर अन्न व पुरवठा अधिकारी कार्यालयात हेलपाट्या खायला लावत आहेत. मात्र, त्याला धान्य अजुनही मिळाले नाही. धान्यासाठी वणवण सुरूच असून ती कधी थांबेल, असा प्रश्न त्याला पडला आहे. (Man trying to get Ration from last 6 months in Nagpur)
कोरोनामुळे अनेकांना उद्ध्वस्त केले. गावात काम नाही म्हणून अनेकजण नागपुरात कामासाठी येतात. यातील रवींद्र बोरकर. श्री. बोरकर हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. कामासाठी २०२० मध्ये नागपूरला नरसाळा येथे आले. गावाकडे त्यांचे कार्ड पिवळे होते. दारिद्र्य रेषेखालील लोकांनी हे कार्ड देण्यात येते. येथे आल्यानंतर त्यांनी मार्च २०२० मध्ये नागपूरच्या मेडिकल झोनच्या अन्न व पुरवठा अधिकाऱ्याकडे बदली कार्डासाठी अर्ज केला. त्याकरिता त्यांनी भंडारा जिल्ह्यातून जिल्हा अन्न व पुरवठा विभागाकडून कार्ड बदलीची रीतसर परवानगी घेतली. कार्यालयातून त्याला केशरी कार्ड देण्यात आले. त्याला आता सहा महिन्याचा काळ लोटला आहे.
मात्र, त्याच्या कार्डला ऑनलाइन मान्यता न मिळाल्याने त्याला धान्य मिळत नाही. गेल्या सहा महिन्यापासून तो पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यालयात विचारणा करीत आहे. आज-उद्या काम होईल, अशी बोळवण करून अधिकारी घरी पाठवीत आहे. कार्ड असूनही त्याला धान्य मिळत नसल्याने दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या रवींद्र बोरकर व त्याच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे काम बंद असून पैसा नसल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न त्याच्यासमोर पडला आहे. शासनाची ‘एक देश एक कार्ड’ ही योजना फक्त देखावा असल्याचे दिसून येते.
(Man trying to get Ration from last 6 months in Nagpur)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.