Gadchiroli Maoists : देवेंद्र फडणवीसांपुढे आत्मसमर्पण करणारा गिरीधर 'पळपुटा'; पत्रकातून माओवाद्यांची आगपाखड

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले.
Maoists
Maoistsesakal
Updated on
Summary

''गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले.''

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापुढे २२ जून रोजी पत्नी संगीतासह आत्मसमर्पण करणारा माओवाद्यांच्या (Maoists) दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याच्यासंदर्भात माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे.

यात चळवळीला पुढे नेण्यासाठी समस्यांचा सामना करण्याऐवजी चळवळ सोडून पोलिसांना शरण जाणारा गिरीधर 'पळपुटा' असल्याची टीका केली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले. यासंदर्भात माओवाद्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले.

Maoists
पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून केला खून; दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, गुन्हा लपविण्यासाठी जयदीपनं इंद्रायणी नदीत..

गिरीधर मागील २८, तर संगीता ही २३ वर्षांपासून माओवादी चळवळीत कार्यरत होती. १९९६ मध्ये गिरीधर माओवादी चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर काम करत त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले. परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक माओवादी नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचा सामना न करता घाबरलेल्या गिरीधरने पळ काढून पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे.

Maoists
Vishal Patil : पालकमंत्र्यांनी पोलिस बळ वापरून 'रात्रीत खेळ' केला; असं का म्हणाले खासदार विशाल पाटील?

दिवंगत माओवादी नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, इंदिरा, वासू यांच्या कार्याचा उल्लेख करून श्रीनिवास याने गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी आंदोलनाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल, असेही त्याने म्हटले आहे.

गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांच्या अनेक नेत्यांना ठार केल्यामुळे त्यांच्या उर्वरीत नेत्यांमध्ये नैराश्य आले आहे. या नैराश्यातूनच ते आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्या माओवाद्यांना धमकावत आहेत.

-नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.