अतिवृष्टीत नवखे प्रयोग करणारे सावरले; फुलविली शेती

गुणवंतराव चौधरी यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना
गुणवंतराव चौधरी यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करतानागुणवंतराव चौधरी यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना
Updated on

सावनेर (जि. नागपूर) : पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीची कास धरून योग्य नियोजनाने लाखोचे उत्पादन घेतल्याचा यशस्वी प्रयोग माळेगाव येथील शेतकरी बंडू ऊर्फ गुणवंत त्र्यंबकराव चौधरी यांनी वडिलांच्या प्रेरणेने साकारला आहे. त्यांच्या वडिलांनी आधुनिक शेतीची कास धरून सेंद्रिय शेतीचा प्रयोग करावा, असा मंत्र दिला होता.

चौधरी यांना शेतीची आवड असल्याने नेहमीच केळीचा बाग, हळद, लसूण, इतर नव्या वानांची लागवड करून वर्षाकाठी नवखे प्रयोग करून बघतात आणि त्यांना यशही मिळत आहे. असाच प्रयोग करण्यास चौधरी इतर शेतकऱ्यांना सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनात काही शेतकऱ्यांनी लाभ मिळविला आहे. यंदाचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे वाया गेले. पिकांना पावसाचा फटका बसल्याने कपाशी तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. फळबागानांही फटके बसले.

गुणवंतराव चौधरी यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना
फिर्याद देण्यासाठी निघाले तिघे भाऊ; अपघातात दोन सख्खे भाऊ ठार

परंतु, यातून नवखे प्रयोग करणारे शेतकरी मात्र सावरलेत. तालुक्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंतराव चौधरी यांनी झेंडू पिकाला सणासुदीच्या दिवसात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे व खात्रीने फुले देणारे पीक म्हणून त्यांनी माळेगाव शिवारातील शेतीमध्ये कापूस, तूर, मका, भाजीपाला याशिवाय उर्वरित तेरा एकर शेतीत झेंडू फुलांची लागवड करून फुलबाग फुलविली व शेतीला नवी जोड दिली आहे.

किमया बघण्यासाठी या शेतात!

श्रावण, गणेशोत्सव, दसरा नुकताच संपला आणि येऊ घातलेला दिवाळी उत्सव या सगळ्याच सणांसाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पारंपरिक शेती सोबतच नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या गुणवंतराव चौधरी व त्यांच्या मार्गदर्शनातील काही शेतकऱ्यांनी या पिकाकडे लक्ष वळवल्याने झेंडू फुलांची शेती फायद्याची ठरली आहे. चौधरी यांची झेंडू फुलांनी बहरलेली शेती बघून बरेच शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, कृषी विभागातील कर्मचारी सुद्धा त्यांची ही किमया बघण्यासाठी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.