‘गॅंगरेप’चा बनाव रचणे तरुणीच्या अंगलट; प्रकार उघडकीस येताच गुन्हा

खळबळजनक घटनेनंतर हादरलेल्या पोलिस विभागाने रात्री उशिरा सुटकेचा निःश्‍वास सोडला
atyachar
atyacharatyachar
Updated on

नागपूर : गायक असलेल्या तरुणीला दोघांनी कारमधून अपहरण करून सामूहिक बलात्कार (Mass atrocities on girls) केल्याची तक्रार पोलिसांकडे करताच शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली. जवळपास ९०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर मेहनत घेऊन गॅंगरेप प्रकरणाचा छडा लावला. तरुणीनेच प्रेमप्रकरणातून स्वतःवर गॅंगरेप झाल्याचा बनाव रचला होता. तांत्रिक तपासानंतर हा बनाव उघडकीस आला. खोटी तक्रार देऊन पोलिस यंत्रणेला कामाला लावल्यामुळे पोलिसांनी तरुणीवरच गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. मात्र, या खळबळजनक घटनेनंतर हादरलेल्या पोलिस विभागाने रात्री उशिरा सुटकेचा निःश्‍वास सोडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय युवती ही कळमेश्‍वर तालुक्यातील खेड्यात राहते. ती गायक असून, धरमपेठमधील संगीत क्लाससाठी नागपुरात ये-जा करते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ती नागपुरात आली. सीताबर्डीत उतरली आणि मुंजे चौकापर्यंत फोनवर बोलत गेली. तेथून ती दगडी पार्कजवळ पोहोचली. तेथे एका कारने दोघे आले. त्या दोघांनी तरुणीचे कारमध्ये कोंबून अपहरण केले.

atyachar
वाहन चालवताना मोबाईलवर बोलताय? होणार तब्बल इतका दंड; वाहन कायदा लागू

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी पुरती घाबरली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. ती कार कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्जनस्थळी थांबली. तेथे दोघांनीही तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. काही वेळानंतर तरुणीने दोन युवकांच्या तावडीतून पळ काढला आणि कळमना पोलिस ठाण्यात पोहोचली. तेथे पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगितला.

पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी लगेच पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठांना घटनेबाबत माहिती दिली. सीताबर्डीसारख्या गजबजलेल्या ठिकाणावरून अपहरण झाल्यामुळे पोलिसांत एकच खळबळ उडाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त अश्‍वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलिस उपायुक्त विनिता साहू, मनीष कलवानीया हे सर्व अधिकारी लगेच सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तरुणीची कसून चौकशी करून वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले. कळमना पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. परंतु, तरुणीने बनाव रचल्याचे उघडकीस येताच पोलिसांना नाहक त्रास झाल्याचे समोर आले.

atyachar
अखिलेश यादवांनंतर यशोमती ठाकूरांचे ट्विट; मोदींना म्हणाल्या...

स्वतःच गेली कळमन्यात

तरुणीला घटनास्थळ आणि कुठे नेले हेसुद्धा माहिती नव्हते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी फोनवर बोलताना सीताबर्डी, मुंजे चौक आणि दगडी पार्ककडे जाताना दिसत आहे. परंतु, अशी कोणतीच कार तरुणीने सांगितलेल्या वेळेत सीसीटीव्हीत दिसत नव्हती. तसेच तिला वारंवार विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देत होती. त्यामुळे तिच्यावरच पोलिसांचा संशय बळावला होता.

अशीही चर्चा

तरुणी ही एका यू-ट्यूब चॅनलसाठी गायन करते. तिचे युवकाशी प्रेमसंबंध होते. परंतु, दोघांच्या प्रेमसंबंधास कुटुंबीयांचा विरोध होता. बलात्कार झाल्याचा बनाव रचल्यास दया निर्माण होऊन दोघांच्या लग्नास होकार मिळू शकतो, असा फाजील आत्मविश्‍वास असल्याने तरुणीने चक्क गॅंगरेप नाट्य रचल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.