गणिताचा पेपर फुटला!

उन्हाळी परीक्षेतील प्रकार : महाविद्यालयांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह
paper leak
paper leakSakal
Updated on

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत मंगळवारी घेण्यात आलेले दोन पेपर रद्द करण्यात आले असताना, गुरुवारी (ता.२३) बीएसस्सीच्या चौथ्या सत्रातील गणित-१ या विषयाचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पेपर फुटल्याची माहिती परीक्षा विभागाला मिळताच, त्यांनी आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घेण्यात आलेला गणिताचा पेपर रद्द केला आहे. पेपर गोंदिया येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान महाविद्यालयांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे

विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याची बाब आता समोर येत आहे. बुधवारी सकाळी पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात बीएसस्सी अभ्यासक्रमांच्या पेपरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी धडक कारवाई करीत, मंगळवारी घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द केले. याशिवाय सदर येथील अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द केल्याची कारवाई केली.

दरम्यान आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास धरमपेठ महाविद्यालयात बीएसस्सीच्या सहाव्या सत्रातील गणित विषयाची परीक्षा सुरू होती. यावेळी एका विद्यार्थ्याला प्रा. रंगारी या प्राध्यापिकेने मोबाईलसह पकडण्यात आले. त्याचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये गणिताचा पेपर असल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्राध्यापिकेने याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. साबळे यांना फोनवरून संपर्क करीत, त्यांना माहिती दिली. यावेळी डॉ. साबळे यांनी हा पेपर नेमका कुठून फुटला याची तपासणी केली. त्यातून तो गोंदिया येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती मिळाली. त्यामुळे परीक्षा विभागाने तत्काळ हा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारीही सिंधू महाविद्यालयातील अंतिम सत्रातील फिजिक्स आणि झुलॉजी विषयाचे पेपर रद्द करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला होता. याशिवाय गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयातही अशाच प्रकारे पेपर फुटल्याने तिथेही पेपर रद्द करीत, तत्काळ दुसरी परीक्षा घेण्यात आली होती.

परीक्षा विभाग करणार कारवाई

गोंदिया येथील येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती समोर आली. याबाबत महाविद्यालयातील प्राचार्यांना विचारणा केली असता, ते बाहेरगावी फिरायला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील लिपिकाने हा पेपर डाऊनलोड केला. त्यानंतर तो कसा काय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला? याची चौकशी करण्यात येऊन महाविद्यालयावर ४८-८ या कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

केंद्र क्रमांकावरून झाला खुलासा

धरमपेठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पेपर आल्याची माहिती परीक्षा विभागाला मिळताच, तो पेपर नेमका कोणत्या महाविद्याद्यालयातून व्हायरल करण्यात आला, याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानुसार पेपरच्या केंद्र क्रमांकावरून तो गोंदिया येथील येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे हा पेपर केंद्रावर८.३५ मिनिटाने डाऊनलोड करण्यात आला. त्यानंतर ८.५४ तो धरमपेठ येथील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आल्याची माहिती मिळाली. यानंतर तो अनेकांनी डाऊनलोड केल्याचे दिसून आल्याने पेपर रद्द करण्यात आला.

६ जुलैला होणार पेपर

पेपर फुटल्याची माहिती मिळताच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गणित-१ या विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत सर्व केंद्रांना सूचना दिल्यात. त्यानंतर हा पेपर पुन्हा ६ जुलैला दुपारी ३.३० ते ५ या दरम्यान होणार असल्याचे परिपत्रक परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले. याशिवाय दरम्यान सिंधू महाविद्यालयातील सहाव्या सत्राचे दोन पेपर उद्या शुक्रवारी घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.