नागपूर : शहरात एमडीची विक्री वाढली आहे. पोलिसांकडून याविरोधात अभियान असल्याचे चित्र असताना, बुधवारी (ता.२१) सकाळी दहा वाजताच्या सुमारास हिवरीनगरातील लोहाना समाज भवनाजवळ अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ९० लाख रुपये किमतीचे ९०७ ग्रॅम एमडी जप्त करून दोघांना अटक केली. यातील एक आरोपी महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी आहे. गेल्या वर्षभरातील एनडीपीएस पथकाची ही मोठी कारवाई आहे.