Government Hospital Recruitment : मेडिकल, मेयो, डेंटलसह शासकीय आयुर्वेदमध्ये चतुर्थश्रेणीच्या ६८० रिक्त पदासाठी भरती

मेयो, मेडिकलसह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय दंत रुग्णालयात वर्ग-४ च्या रिक्त पदांमुळे प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
Meyo Hospital nagpur
Meyo Hospital nagpursakal
Updated on

नागपूर - मेयो, मेडिकलसह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय दंत रुग्णालयात वर्ग-४ च्या रिक्त पदांमुळे प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मेडिकलमध्ये एक अटेंडंट एका दिवशी तीन ते चार वॉर्ड सांभाळतो. तर अनेकदा अटेंडंट अभावी शस्त्रक्रियादेखील रद्द होण्याची जोखीम असते.

मात्र यावर मलमपट्टी लावण्यासाठी ६८० पदे भरण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाली. ६८० जागांसाठी ६४ हजार अर्ज आल्याची माहिती पुढे आली असून एका पदासाठी १०० बेरोजगारांनी अर्ज केला आहे. यात पदवी, पदव्युत्तर पास उमेदवारांचा समावेश आहे.

७ महिने उलटूनदेखील रिक्त पदांची भरती झाली नाही. येत्या २६ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही वैद्यकीय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मेयो मेडिकलसह शहरातील सरकारी रुग्णालयात श्रेणी-४ च्या पदांमध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, हमाल, कक्ष परिचर, गॅगमन, माळी, संग्रहालय परिचर, किचन, स्टोअर बॉय, क्लीनर अशा ६८० पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार होती.

मात्र परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याने उमेदवार प्रतीक्षेत होते. सर्वच सरकारी रुग्णालयात खासगी एजन्सीच्यामार्फत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नेमून तात्पूरती मलमपट्टी लावण्याचे प्रकार सुरू होते. अखेर जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हा निवड समितीमार्फत येथे कर्मचारी भरती जाहीर झाली. २० डिसेंबरच्या अधिसूचनेनंतर जानेवारीपर्यंत स्थायी नोकरीसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

अखेर मुहूर्त सापडला

परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यायची आहे. त्यासाठी आयबीपीएस एजन्सीला कंत्राट दिले. सात महिन्यानंतरही परीक्षा केंद्र उपलब्ध झाली नाही. मार्चपासून परीक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र मुहूर्त मिळत नसल्याची माहिती पुढे आली. ऑनलाइन परीक्षेसाठी शहरात मर्यादित केंद्र आहेत. अखेर २६ ऑगस्टपासून परीक्षा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शासकीय रुग्णालयांमध्ये वर्ग ४ च्या पदांवर वर्षानुवर्षे नियुक्ती होत आहेत. मात्र, सरकारने किमान पात्रता १० वी ठेवली आहे. मात्र बेरोजगारांची संकट लक्षात घेता चतुर्श्रेणीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश आहे.

अशी आहे जागांची आकडेवारी

मेडिकल - ४३२

मेयो - १९१

आयुर्वेद - २३

दंत - २२

सावनेर - ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.