उपराजधानी हादरली! दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून; लष्करीबागेतील थरार

उपराजधानी हादरली! दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून; लष्करीबागेतील थरार
Updated on

नागपूर : दगडाने ठेचून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना (Nagpur Crime) शुक्रवारी रात्री लष्करीबाग परिसरात घडली. दारू पिण्यावरून उद्‍भवलेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. (Men attacked on 20 year old boy in Nagpur)

उपराजधानी हादरली! दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून; लष्करीबागेतील थरार
एसटी प्रवाशांनो, आता होणार ॲन्टीजेन टेस्ट

कपिल शशिकांत बेन (२०) असे मृताचे नाव आहे. ढोल वाजविण्याचे काम करणारा कपिल मोतीबागजवळील नुवा फॅक्टरीजवळील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार कपिल काही मित्रांसोबत समतानगरात गेला होता. एका मैदानात दोन ते तीन गुंड त्यांना भेटले. कोणत्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हाणामारीत गुंड प्रभावी ठरत असल्याने कपिल व त्याचे मित्र पळून जाऊ लागले.

आरोपींनी त्यांचाही पाठलाग सुरू केला. लष्करीबाग भागातील एका गल्लीतून पळून जात असताना दोन ते तीन आरोपींनी कपीलवर दगड व विटांनी हल्ला चढविला. आरोपींनी त्याच्या डोक्यावर फटके हाणने सुरू केले. गंभीर जखमी होऊन तो खाली कोसळताच आरोपींनी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला.

घटनेचे नेमके कारण कळू शकले नसले तरी दारू पिण्यावरू वाद उद्‍भवल्याची चर्चा परिसरात होती. घटनेनंतर आरोपी पळून गेले. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. कपीलच्या परिचितांनी घटनास्थळी येऊन संताप व्यक्त करणे सुरू केले.

उपराजधानी हादरली! दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून; लष्करीबागेतील थरार
'ही भाजपची नौटंकी'; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यापाठोपाठ वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त कुमक बोलावून घेण्यात आली. मृताची ओळख पटताच पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. आगपाखड करणाऱ्या कपीलच्या परिचितांची समजून काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

(Men attacked on 20 year old boy in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()