नागपूर ः मैत्रिणीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असलेल्या १५ वर्षीय मुलीचे दोन युवकांनी दुचाकीने अपहरण केले. तिला गोरेवाड्याच्याच जंगलात नेऊन दोघांनी मुलीवर गॅंगरेप केला. तिला रात्रीला घरी सोडून पळ काढला. मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. शमशाद उर्फ सॅम रफिस अन्सारी (२१, विश्वासनगर, गिट्टीखदान) आणि बबलू उर्फ बब्बू मोहन कतवटे (२१, विश्वासनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित १५ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) आईवडीलासह जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती गुरूवारी (ता.१२) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास मार्टीननगरात आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी होती.
अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मैत्रिण भेटायला आली नसल्याने ती घरी परत जात होती. दरम्यान आरोपी सॅम आणि बब्बू हे दोघे पल्सरने तेथे आले. त्यांनी तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. तिने नकार देताच तिला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी दुचाकीवर बसवले. एका चायनिज ठेल्यावरून खायला पार्सल घेतले.
त्यानंतर मुलीला गोरेवाडा जंगलात नेले. एका झाडाझुडूपात नेऊन तिच्यावर दोघांनीही सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर सात वाजताच्या सुमारात त्या मुलीला घराजवळ आणून सोडले. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
असा आला प्रकार उघडकीस
रिया घरी येताच तिने स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यानंतर तिने सायंकाळी जेवन न करताच झोपली. सकाळी ते भेदरलेल्या अवस्थेत असल्याचे आईच्या लक्षात आले. त्यामुळे तिला विश्वासात घेऊन आस्थेने विचारपूस केली असता तिने दोन युवकांनी केलेल्या शारीरिक अत्याचाराबाबत सांगितले. तिच्या आईऩे थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली.
सीसीटीव्ही फुटेजवरून सुगावा
गुन्हा दाखल केल्यानंतर डीसीपी निलोत्पल यांनी प्रकरणात गांभीर्य दाखवले. पीआय फटांगरे यांनी लगेच डीबी पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. फुटेजमध्ये दोन युवक दुचाकीवरू आले आणि मुलीशी बोलताना दिसले. त्यावरू दोन्ही युवकाच्या शरीरयष्ठी आणि परीसरात फोटो दाखवून दोन्ही आरोपींची ओळख पटविली. दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.