Mental Health : मोबाईलमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, स्क्रिन टाईम मर्यादित ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Mental Health : मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसारख्या डिजिटल माध्यमांमुळे मुलांच्या वागणुकीत बदल होऊन त्यांच्यात चिडचिडेपणा, आक्रमकता वाढतेय.
Mental Health
Mental Healthesakal
Updated on

Mental Health : चिमुकल्या वयापासूनच जिंकण्यासाठी सुरू असलेल्या ‘रेस’ने मुलांच्या आयुष्यात तणाव वाढवला आहे. त्यातच त्यांच्या हाती मोबाईल आला. याचा परिणाम मुलाच्या मानसिक आरोग्यावर होतोय. मोबाईलमुळे मैदानी खेळ हरवले. अर्धवट झोपेमुळे मानसिक आजारांचा विळखा त्यांना बसला.

हे टाळण्यासाठी मुलांचा मोबाईलवरील स्क्रिन टाईम लिमिटेड केलाच पाहिजे, असा सल्ला सायकॅट्रिक सोसायटी ऑफ नागपूरचे अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे यांनी दिला. मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसारख्या डिजिटल माध्यमांमुळे मुलांच्या वागणुकीत बदल पडून त्यांच्यात चिडचिडेपणा, आक्रमकता वाढल्याचे ते म्हणाले.

Mental Health
Mental Health: मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मुलांसोबत खेळा बुद्धिबळ

विदर्भ सायकॅट्रिक असोसिएशन आणि सायकॅट्रिक सोसायटी ऑफ नागपूरच्या वतीने १५ व १६ जूनला शहरात दोनदिवसीय वार्षिक परिषद आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुलांमध्ये स्क्रीन टाईम वाढल्याने अभ्यासात एकाग्रतेचा अभाव दिसून येतो.

या परिषदेत बेवारस मनोरुग्णांवर मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवानी, पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिक आरोग्यावर डॉ. शशांक शेषाद्री, तरुणांच्या आत्महत्येवर डॉ. अविनाश देसोजा, लहान मुलांच्या मानसिक, लैंगिक छळावर डॉ. नीलेश शाह मार्गदर्शन करतील. परिषदेचे उद्‍घाटन रविवारी (ता. १६) सकाळी १० वाजता डॉ. लक्ष्मीकांत राठी यांच्या हस्ते होणार आहे.

आत्महत्येचे प्रमाण दोन तृतीयांश

रिलेशनशिप क्रायसीसनंतर तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे, असे नमूद करीत मानसोपचार सोसायटीचे सचिव डॉ. सुधीर महाजन म्हणाले, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे कुटुंबातच समुपदेशन व्हायचे. सोबतच ते आपल्या भावना समवयस्कांशी शेअर करायचे. आज लहान कुटुंब, मोबाईलमुळे आलेल्या एकलकोंडेपणामुळे तरुण आपल्या भावनाच व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे नैराश्य टोकाला जाऊन क्षणात जीवन संपविणाऱ्यांचे प्रमाण दोन तृतीयांशपेक्षा अधिक आहे.

अर्धी तरुणाई आभासी दुनियेत वावरते. पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिकतेत झपाट्याने बदल होतो. अशावेळी ही मुले समाजमाध्यमांच्या आभासी दुनियेलाच खरी दुनिया मानतात. त्यामुळे अशा मुलांना पालकांनी समजून घेत वास्तविक जगाचे भान दिले पाहिजे.

-डॉ. दुर्गा बंग, मानसोपचार तज्ज्ञ

Mental Health
Mental health : सोशल मीडियावरील ‘ट्रोलिंग’ मुळे मनोविकाराचे वाढतेय प्रमाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.