Women Empowerment : पारंपरिक उद्योगांना मिळणार बळकटी! लद्दाखच्या कारागीरांच्या हाती ‘एमगिरी’चे तंत्रज्ञान

Women Empowerment : महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे लद्दाखमधील पारंपरिक कारागीर टिकवून ठेवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी 'क्रिएट' केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महिलांना सौर उर्जेवर आधारित नवनवीन उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
Women Empowerment
Women Empowermentsakal
Updated on

वर्धा : येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेने (एमगिरी) विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा देशातील दुर्गम भागात होऊ लागला आहे. खादी ग्राम आणि उद्योग आयोगाने केंद्रशासित प्रदेश लडाख प्रशासनाच्या पाठिंब्याने पारंपरिक उद्योगांना बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एमगिरी’च्या तंत्रज्ञानाने लद्दाखमधील पारंपरिक कारागीर टिकवून ठेवण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ''सेंटर फॉर रुरल एंटरप्रायझेस एक्सेलरेशन थ्रू टेक्नॉलॉजी (क्रिएट)'' केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

लद्दाख येथील ‘क्रिएट’ सेंटरमध्ये ‘एमगिरी’ने तेल काढण्याचे यंत्र आणि सौर ड्रायर हे तंत्रज्ञान स्थापित केले आहे. त्यानुसार लेह-लद्दाख प्रदेशातील लॅव्हेंडरच्या फुलांपासून तेल काढण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले. त्यात लद्दाख प्रदेशातील सासपोचे, फियांग गावातील आणि दुर्गम भागातील अनेक महिलांना डॉ. प्रशांत तायडे यांनी प्रशिक्षण दिले.

तत्पूर्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी यांनी ‘क्रिएट’ केंद्राचे व्हर्चुअल मोडच्या माध्यमातून उद्‍घाटन केले. ‘एमगिरी’चे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे यावेळी व्हर्चुअली उपस्थित होते. लद्दाख प्रदेशात जर्दाळू आणि तत्सम इतर वस्तू सुकविण्यासाठी सोलर ड्रायरचा वापर होत आहे.

लद्दाख प्रदेशातील अभ्यागतांना आणि खादी ग्राम आयोगातील इतर अधिकारी आणि लद्दाख प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोलर ड्रायरचे फायदे समजावून सांगितले. ‘एमगिरी’ने काही वर्षांपूर्वी सासपोचे आणि फियांग गावांमध्ये दोन महिला गटांच्या सहकार्याने सौर उर्जेवर चालणारे लोकर प्रक्रिया यंत्र आणि गुलाबांच्या बिया काढण्याचे तंत्रज्ञान स्थापित केले आहे. या महिला गटांच्या मागणीनुसार त्यांना गणेश थेरे, कल्पेश देशमुख यांनी प्रशिक्षण दिले.

महिलांनी निर्मित केले ‘लेह-दीप’

सासपोचे, लिकर, यांगथांग आणि हेमिस गावांतील २० बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला गटांना एलईडी तयार करण्याच्या किट देण्यात आल्या. त्यांनी यातून स्वतःचा ब्रँड ''लेह-दीप'' नावाने नऊ आणि बारा वॅटचे एलईडी बल्ब, कलर लाइट आणि इन्वर्टर आधारित १० वॅटच्या बल्बचे निर्माण यशस्वीरीत्या केले आहे.

मेघालयातही काम

मेघालयातील परंपरागतपणे काम करणाऱ्या भांडी युनिट्ससाठी संशोधन आणि नवीन डिझाइन विकसित करण्यासाठी मेघालय सरकारने एक प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पावरही ‘एमगिरी’ने काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत ‘एमगिरी’ने काळ्या मातीची भांडी विकसित करण्यासाठी, कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.