MHT-CET Exam : अभियांत्रिकीमध्ये वाढणार यंदा गर्दी; सीईटीमध्ये वाढली विद्यार्थीसंख्या

गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, दोन वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशामध्ये वाढ झाली.
CET Exam
CET Examsakal
Updated on

नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, दोन वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशामध्ये वाढ झाली. एमएचटी-सीईटीमध्ये पीसीबी गटात वाढलेल्या विद्यार्थ्यांची संख्येने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये यंदाही ती गर्दी वाढणार असल्याची शक्यता आहे.

राज्यात साडेसहाशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यामध्ये १ लाख ४४ हजार ४८० जागांचा समावेश आहे. यंदा स्वायत्त महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. राज्यात पन्नासाहून अधिक स्वायत्त महाविद्यालये असून त्यातही २० हजारांवर विद्यार्थी संख्या आहे. पूर्व विदर्भात ४२ अभियांत्रिकी महाविद्यालयात १८ हजार ५०० जागा आहेत.

यंदा अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये पीसीएम गटात ३ लाख ७९ हजार ८०० विद्यार्थी तर पीसीबी गटात २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

त्यापैकी बहुतांश विद्याथी हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत. यातील १०ते १५ टक्के विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षाही दिली. मात्र, वाढलेला कट ऑफ आणि मनाप्रमाणे मिळणारी आयआयटी यामुळे किती विद्यार्थी त्याकडे जातात हा प्रश्‍न आहे. मात्र, या संख्येमुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात गर्दी होणार आहे.

चुरस कायम राहणार

राज्याच्या सीईटी सेलच्या माध्यमातून यंदा घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी सुमारे ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी दिली. नागपूर विभागातून सुमारे ६५ हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा असल्याने यावर्षी प्रवेशात चुरस राहणार असल्याचे चित्र आहे. मात्र, शेवटी यातील किती विद्यार्थी प्रवेश घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.