MHT-CET Exam Result 2024 : एमएचटी-सीईटीत पार्थ असाटी, सौम्या दीक्षित प्रथम

राज्याच्या सीईटी सेलच्या माध्यमातून पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिलदरम्यान परीक्षा झाली होती.
MHT-CET Exam Result 2024
MHT-CET Exam Result 2024Sakal
Updated on

Nagpur News : अभियांत्रिकीसह फार्मसी, कृषी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या एमएचटी-सीईटी परीक्षेत १०० पर्सेंटाईलसह पीसीएम गटात शहरातून पार्थ पद्मभूषण असाटी याने प्रथम तर पीसीबी गटातून सौम्या दीक्षित हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या निकालाची घोषणा रविवारी (ता.१६) सांयकाळी करण्यात आली.

राज्याच्या सीईटी सेलच्या माध्यमातून पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिलदरम्यान परीक्षा झाली होती. याशिवाय २ ते १७ मेदरम्यान पीसीएम गटाची परीक्षा घेण्यात आली. राज्यात दोन्ही गटात ५ लाख ९१ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याशिवाय ४५ हजार ६६९ विद्यार्थी अनुपस्थित होते.

राज्यात अभियांत्रिकीच्या अडीच लाखावर जागा असून त्यापाठोपाठ सव्वा लाखावर फार्मसीच्या जागा आहेत. निकालात यंदा वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहे. त्यात पीसीबी गटात अकोल्याची श्रेया भोळे, अमरावतीचा आदित्य डगवार व आदेश निचत यांना १०० ला पर्सेंटाइल मिळाले आहेत. याशिवाय पीसीएम गटात वर्ध्याचे प्रणव गावंडे आणि अंकिता सागर यांनीही १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत.

‘आयआयटीमध्ये जाणार’

एमएचसीईटीमध्ये शहरातून प्रथम आलेला पार्थने जेईई ॲडव्हान्समध्ये २२८० वे रॅंक मिळाविले आहे. त्यामुळे तो आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेणार आहे. त्याचे वडील डॉ. पद्मभूषण असाटी हे आशा हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. सिंधू असाटी या गृहिणी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.