Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

Lost Mobile: दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेला मोबाईल हरवला किंवा गहाळ झाला, तर आता पोलिस ठाण्यात हेलपाटे मारण्याची गरज नाही.
Lost Mobile
Lost Mobileesakal
Updated on

Lost Mobile : दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेला मोबाईल हरवला किंवा गहाळ झाला, तर आता पोलिस ठाण्यात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या एका संकेतस्थळावर हरवलेल्या मोबाईलचा ‘आयएमईआय’ क्रमांक टाकला की, त्या तक्रारीवर केंद्र सरकारच्या यंत्रणा काम सुरू करतात अन् माग लागला की, संबंधित नागरिक राहत असलेल्या पोलिस ठाण्यात त्याचे तपशील पाठविले जातात.

त्या माध्यमातून तक्रारदाराला त्याचा मोबाईल सहज मिळू शकतो. या पद्धतीने एक वर्षात सर्वाधिक कर्नाटकमध्ये ३५ हजार ९४५ मोबाईल, तर तेलंगणामध्ये ३० हजार ४९ मोबाईल नागरिकांना परत मिळाले आहेत. या क्रमवारीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, एक वर्षात राज्यातील १५ हजार ४२६ नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले आहेत.

Lost Mobile
Mobile Hang Problem : मोबाईल सतत होतोय हँग? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून तर बघा, स्मार्टफोन होईल सुपरफास्ट

काय आहे व्यवस्था ?

केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर’ www.ceri.gov.in हे संकेतस्थळ गेल्या वर्षी १७ मे रोजी सुरू झाले. या संकेतस्थळावरून नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाइल संच सहजरीत्या परत मिळण्याची व्यवस्था आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील सी-डॉटने याबाबतची प्रणाली विकसित केली आहे. देशात कर्नाटकमध्ये २०२२ मध्ये सुरुवातीला हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. तो यशस्वी झाल्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

अशी आहे पद्धत

मोबाइल गहाळ झाल्यावर नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार द्यायची. त्याच्या आधारे त्यांना गहाळ झालेल्या मोबाइल संचातील सीम कार्डचे डुप्लिकेट सीम मोबाइल कंपनीकडून मिळते. ते ॲक्टिव्हेट झाल्यावर खात्रीसाठी त्यावर ओटीपी येतो. त्याच्या आधारे www.ceri.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवताना गहाळ झालेल्या मोबाइल संचाचा आयएमईआय क्रमांक नोंदविला जातो.

गहाळ झालेल्या मोबाइलचा वापर कुठे सुरू झाल्यास त्याचे नोटिफिकेशन तक्रार केलेल्या संकेतस्थळावर येते. सर्व्हरद्वारे त्या मोबाइलचे तपशील तक्रारदार राहत असलेल्या पोलिस ठाण्यात पाठविले जातात. तसेच ज्याचा मोबाईल गहाळ झाला आहे, त्यांनाही कळविले जाते.

आपल्या नजीकच्या पोलिस ठाण्यात आलेल्या तपशीलाच्या आधारे पोलिसांच्या मदतीने गहाळ झालेला किंवा हरविलेला मोबाइल परत मिळू शकतो.

गहाळ झालेल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक करण्याचाही ‘ऑप्शन’ या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध आहे

मोबाइल मिळण्याचे प्रमाण

  • www.ceri.gov.in संकेतस्थळ कार्यान्वित होऊन एक वर्ष

  • ९ लाख ३२ हजार ०६५ - वर्षभरात देशातील नागरिकांना परत मिळालेले मोबाइल

  • १६ लाख ५६ हजार ८४३ -कायमस्वरूपी ब्लॉक केलेले

  • सुमारे ५ हजार - महाराष्ट्रात रोज गहाळ होणारे

(हा अंदाज ‘महासायबर’ विभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला)

मोबाईलचा आयएमईआय क्रमांक प्रत्येकाने नोंदवून ठेवणे गरजेचे आहे. मोबाईल हरवल्यास केंद्र सरकारच्या संकेतस्थळामुळे तो मिळणे आता सोयीचे झाले आहे. संकेतस्थळावर जाऊन मोबाईल चोरी किंवा अन्य सायबरचोरीची तक्रार नोंदवता येते. त्यावरून कायदेशीर कारवाई करता येते. यामुळे हरवलेला मोबाईल परत मिळणे सोपे होते.

- मारोती शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम, नागपूर

Lost Mobile
Mobile Care Monsoon : पावसाळ्यात 'या' 7 टिप्स वापरून घ्या तुमच्या मोबाईलची काळजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.