Mpox Disease : नागपूर विमानतळावर ‘मंकीपॉक्स’ संशयितांची तपासणी

‘मंकीपॉक्स’चे जगभरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र व राज्य शासनाने मंकीपॉक्सचे सकारात्मक व संशयित रुग्णांच्या तपासणी, सर्वेक्षण, उपचारासह इतर गोष्टींबाबत मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत.
Mpox
Mpox sakal
Updated on

नागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘मंकीपॉक्स’ संशयित रुग्ण आढळल्यास त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याला करण्यात आली आहे. सोबतच महापालिकेकडून या विभागाला ‘मंकीपॉक्स’बाबत मार्गदर्शक सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.