Nagpur Rain Update : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धडकणार मॉन्सून

Nagpur News : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; हालचालीसाठी अनुकूल वातावरण
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहेesakal
Updated on

Monsoon News : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून येत्या रविवारी अंदमानात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. मॉन्सूनची प्रगती यापुढेही अशीच कायम राहिल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांसह सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या मॉन्सूनच्या हालचाली सुरू झाल्या असून, अनुकूल परिस्थितीमुळे येत्‍या १९ मे रोजी अंदमानात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे मॉन्सून अंदमानात २२ मेच्या आसपास दाखल होतो; मात्र यंदा दोन-तीन दिवस आधीच प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आगामी काळात कसल्याही अडथळ्याविना मॉन्सूनची प्रगती कायम राहिल्यास, येत्या एक जूनपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी विदर्भात आगमन अपेक्षित आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे
Nagpur News : ‘एआय’चा फटका बसतोय प्रकाशन व्यवसायाला

अधिकाऱ्यांच्या मते, विदर्भात मॉन्सूनच्या सरासरी आगमनाची तारीख १५ जून आहे. त्यामुळे या तारखेच्या आसपास यावेळी मॉन्सून दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र यासंदर्भात निश्चित तारीख मेच्या शेवटच्या आठवड्यातच ठामपणे सांगता येणार आहे. तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ अशी आमची भूमिका राहणार आहे. त्यापूर्वी विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व मॉन्सूनपूर्व सरींची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे
Nagpur News : ४८ गावांत हरितक्रांतीचे नुसते स्वप्नच

तीन वेळाच लवकर आगमन

गेल्या दशकात विदर्भातील आतापर्यंतच्या मॉन्सूनच्या तारखेवर नजर टाकल्यास, केवळ तीन वेळा मॉन्सूनने निर्धारित तारखेच्या आधी विदर्भात एन्ट्री केली. २०१८ मध्ये ८ जूनला, २०२१ मध्ये ९ जूनला, तर २०१५ मध्ये १३ जून रोजी मॉन्सूनने प्रवेश केला होता. गतवर्षी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने अडथळा आणल्यामुळे मॉन्सून १५ वर्षांत प्रथमच उशिरा म्हणजे २३ जूनला विदर्भात दाखल झाला होता. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे त्यावेळी बरेच दिवसपर्यंत मॉन्सून केरळ व कोकणात रेंगाळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.