Monsoon Update : बळीराजासाठी आनंदवार्ता; विदर्भात कधीही धडकू शकतो मॉन्सून? मॉन्सूनपूर्व पावसाचीही शक्यता

पावसाळ्यातील पहिले मृग नक्षत्र आरंभ होऊन तीन दिवस लोटूनही अद्याप विदर्भात दमदार मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला नाही.
monsoon hit vidarbha pre-monsoon rain is also likely weather update
monsoon hit vidarbha pre-monsoon rain is also likely weather updateSakal
Updated on

नागपूर : राज्यात मॉन्सून दाखल झाला असून, आता लवकरच विदर्भातही आगमन होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असल्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत विदर्भात धडकण्याची दाट शक्यता आहे. एरवी चंद्रपूरकडून येणारा मॉन्सून यवतमाळ व बुलडाणामार्गे विदर्भात दाखल होणार असल्याचे संकेत, प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

पावसाळ्यातील पहिले मृग नक्षत्र आरंभ होऊन तीन दिवस लोटूनही अद्याप विदर्भात दमदार मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला नाही. त्यामुळे वैदर्भीय शेतकरी चिंतीत असून, मॉन्सूनची प्रतीक्षा करीत आहेत. मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे मंगळवारी किंवा बुधवारी विदर्भात एंट्री करण्याची दाट शक्यता आहे.

यावेळी नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून यवतमाळ व बुलडाणामार्गे विदर्भात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या मते, मॉन्सून महाराष्ट्रातील डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपर्यंत तसेच तेलंगणमधील निजामाबादपर्यंत आला आहे. कसलाही अडथळा न आल्यास येत्या दोन-तीन दिवसांत कधीही विदर्भात मॉन्सूनचे आगमन होऊ शकते.

एरवी विदर्भाचे दक्षिण टोक असलेल्या चंद्रपूरकडून मॉन्सून प्रवेश करतो. मात्र यावेळी पश्चिम विदर्भातील यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्याकडून येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावर्षी एकूणच मॉन्सूनचा एकूणच प्रवास ‘बिफोर टाइम’ सुरू आहे. अंदमानात दोन दिवस अगोदर आगमन झाल्यानंतर केरळमध्येही वेळेपूर्वीच दाखल झाला. हीच मालिका यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या आगमनापूर्वी नागपूर व विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस तसेच हलक्या मॉन्सूनपूर्व सरींचीही शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १५ जून आहे. मात्र गतवर्षी तब्बल आठ दिवस उशिरा (२३ जून) मॉन्सूनचे आगमन झाले होते.

विदर्भातील पारा ४३ अंशांवर

मॉन्सूनपूर्व पाऊस न झाल्याने विदर्भातील पाराही वाढू लागला आहे. सोमवारी ब्रह्मपुरीचे कमाल तापमान ४३ अंशांवर गेले. तर नागपुरातही तापमानाने दीड अंशांची उसळी घेत पारा चाळीशीपार (४१.२ अंश सेल्सिअस) गेला. उन्हासोबतच ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.