Nagpur Weather Update : नवतपापर्यंत विदर्भात वादळी पाऊस? प्रादेशिक हवामान विभागाचा यलो अलर्ट

विदर्भावर गेल्या आठ दिवसांपासून ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’चा प्रभाव आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ तयार होत आहे.
monsoon imd yellow alert in vidarbha navtap heavy rainfall expected nagpur
monsoon imd yellow alert in vidarbha navtap heavy rainfall expected nagpur Sakal
Updated on

नागपूर : एप्रिलपाठोपाठ मे महिन्यात अधून-मधून हजेरी लावणाऱ्या पावसाचा विदर्भातील मुक्काम आणखी चार-पाच दिवस म्हणजेच नवतपापर्यंत लांबण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे. तसा इशारा (यलो अलर्ट) प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

विदर्भावर गेल्या आठ दिवसांपासून ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’चा प्रभाव आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ तयार होत आहे. या दोहोंच्या प्रभावामुळे विदर्भात पुढील काही दिवस कडक ऊन, वादळ व अवकाळी पावसाचा खेळ चालणार आहे. ही स्थिती नवतपापर्यंत कायम राहणार आहे. चक्रीवादळ ओडिशा, मध्यप्रदेशमार्गे उत्तर भारताकडे सरकणार असले तरी, त्याचा थोडाफार प्रभाव विदर्भातही दिसून येणार आहे.

दरम्यान, कमाल तापमानाचा आलेख रविवारीही वर सरकला. वाशीम वगळता पुन्हा विदर्भातील तापमानात एक ते तीन अंशांची वाढ झाली. शनिवारच्या तुलनेत नागपूरच्या पाऱ्यात १.७ अंशांची वाढ होऊन तापमान ३८.६ अंशांवर गेले. उन्हाचा सर्वाधिक तडाखा सहन करीत असलेल्या अकोला येथे आजही सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ब्रह्मपुरी (४२.२), यवतमाळ (४१.५), वर्धा (४१.५) व चंद्रपूर (४१.२) येथेही उन्हाची काहिली जाणवली.

विदर्भातील तापमान

शहर - तापमान

  • नागपूर ३८.६

  • अमरावती ४०.८

  • वर्धा ४१.५

  • अकोला ४३.२

  • बुलडाणा ४०.८

  • यवतमाळ ४१.५

  • गोंदिया ३८.४

  • वाशीम ३९.६

  • ब्रह्मपुरी ४२.२

  • चंद्रपूर ४१.२

  • गडचिरोली ३६.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.