बापरे! या शहरात दिवस उजाडताच वाढतात कोरोनाबाधित; अद्याप ७२ जणांची नोंद...

More nine corona positive patient found in Nagpur
More nine corona positive patient found in Nagpur
Updated on

नागपूर : उपराजधानीत कोरोनाबाधितांची दर दिवसाला वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली आहे. शनिवार (ता. 18) आमदार निवास येथे विलगीकरणात असलेल्या चार कोरोना संशयितांचा अहवाल मेयोच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची संख्या 63 झाली होती. रविवारचा दिवस उजळत नाही तोच आणखी नऊ रुग्ण वाढले आहेत. यामुळे नागपुरातील एकूण रुग्णांची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. दिवस उजळत नाही तोच रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. 

नागपूर शहरात अखिल भरतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) या तीन प्रयोगशाळा आहेत. पशुवैद्यक विभागाची एक प्रयोगशाळा आहे. तीन प्रयोगशाळांमध्ये शनिवारी दोनशेवर नमुने तपासण्यात आले. यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदानातून स्पष्ट झाले होते. 

सतरंजीपुरातील 23 वर्षीय युवतीसह 29 आणि 30 वर्षाचा युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. तसेच मोमीनपुरा परिसरातील एक बाधित आढळला होता. हे सर्व आमदार निवासात विलगीकरणात होते. कोरोनाबाधित असल्याचा अहवाल येताच चौघांनाही मेडिकल-मेयोत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

शनिवारचा दिवस संपला आणि रविवारची सकाळी झाली असतानाचा आणखी एक वाईट बातमी आली. शांतीनगर व सतरंजीपुरा येथील नऊ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 72 वर पोहोचली आहे. हे नऊही पॉझिटिव्ह आमदार निवासात विलगीकरणात होते. या नऊही जणांचे नमुने मयोतील प्रयोगशाळेत तपासले आहेत. 

शनिवारी तपासलेल्य 200 नमुन्यामध्ये यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, येथील कोरोना संशयितांचे नुमने होते तर मेयो प्रयोगशाळेने नागपूर शहरातील जिल्ह्यातील 65 नमुने तपासले. यातील 52 नमुने आमदार निवासात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे आहेत. उर्वरित नमुन्यांमध्ये मेयो आणि भंडारा जिल्ह्यातील व्यक्तींचे होते. यातील नागपूरच्या एकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील दक्षिण नागपूर वगळता इतर सर्वच भागात कोरोनाबाधित असल्याचे प्रयोगशाळेच्या नमुन्यातून पुढे आले आहे. 

बुधवारीच आढळला नाही रुग्ण

या आठवड्यात एक दिवस अर्थात बुधवारी दिवसभरात एकही कोरोनाबाधित आढळला नव्हता. यामुळे प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला होता. ही साखळी खंडित होणे आवश्‍यक असल्याचे बोलले जात होते. परंतु, गुरुवारी दोघांना, शुक्रवारी एकाला तर शनिवारी आणखी चौघांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे प्रशासनाची पुन्हा चिंता वाढली आहे. तातडीने प्रशासनाने दोघांना विलगीकरण कक्षातून मेडिकल-मेयो मध्ये उपचारासाठी रवानगी केली आहे. 

582 व्यक्ती विलगीकरणात

शहरात रवी भवन, आमदार निवास, वनामती, लोणारासह इतर ठिकाणी सुमारे 582 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर ज्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले, त्यांची संख्या 451 आहे. नागपूर महापालिकेचा आरोग्य विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागाकडून दर दिवसाला घरी विलगीकरणात असलेल्यांच्या आरोग्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

यवतमाळमध्ये आठ पॉझिटिव्ह

आयसोलेशन वार्डमध्ये गत काही दिवसांपासून भरती असलेल्या दोन जणांचे नमुने पॉझेटिव्ह असल्याचा अहवाल काल रात्री उशिरा वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.