नागपूर : कडक निर्बंध, नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद आणि लसीकरणाचा (Corona Vaccination) सकारात्मक परिणाम दिसत असून गेल्या तीन दिवसांत कोरोना बाधित (Corona patients) होणाऱ्यांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ७२ तासांत १८ हजार ४३ जणांना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले तर कोरोनाच्या विळख्यात अडलेल्या २१ हजार २४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, मृतांचा आकडा पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी झालेल्या(ता.२) ११२ मृत्यूसहित मागील तीन दिवसांमध्ये २९९ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. ( More than 21 thousand people defeat corona in just 3 days in Nagpur)
जिल्ह्यात २४ तासांत ११२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५ हजार ७ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. कोरोनाचे मृत्यू वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक आढळले आहेत. नागपूर शहरात १ मे रोजी ४ हजार ८५ जणांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. तर ग्रामीण भागातील २ हजार २७९ आणि जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्या १२ जणांना बाधा झाली. असे एकूण जिल्ह्यात ६ हजार ५७६ नवीन कोरोनाबाधित आढळले. तर २ मे रोजी शहरात पन्नास टक्क्यांने घट झाली.
२ हजार ७२४ शहरात तर ग्रामीण २ हजार २६९ आणि जिल्ह्याबाहेरील १४ असे एकूण जिल्ह्यात ५ हजार ७ नवीन कोरोनाबाधित आढळले. त्या तुलनेत १ मे रोजी शहरात ४ हजार ७७३ जणांसह ग्रामीण भागातील २ हजार ८०२ अशा एकूण ७ हजार ५७५ जणांनी कोरोनाला हरवले. तर २ मे रोजी शहरातील ४ हजार ५९६ आणि ग्रामीण १ हजार ७८० अशा एकूण ६ हजार ३७६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सलग तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या वाढली आहे. यामुळे आतापर्यंत जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १९ हजार ३७० झाली आहे. तर या तुलनेत ३ लाख ३७ हजार ६४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ७ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ८८, शनिवारी ९९ तर रविवारी ११२ रग्णांचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्णसंख्या ७५ हजाराखाली
एप्रिलमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने शहरात ४२ हजार २७६ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. तर ग्रामीण भागात ३१ हजार ८५१ असे एकूण जिल्ह्यात ७४ हजार १२७ सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यातील ६५ हजार २३७ रुग्णांवर गृहविलगिकरणात उपचार सुरू आहेत. तर गंभीर संवर्गातील ८ हजार ८९० रुग्णांवर मेयो, मेडिकलसह विविध कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
३० एप्रिल :
कोरोनाबाधित - ६,४६१
कोरोनाममुक्त - ७,२९४
१ मे :
कोरोनाबाधित - ६,५७६
कोरोनामुक्त - ७,५७५
२ मे :
कोरोनाबाधित - ५००७
कोरोनामुक्त - ६,३७६
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.