Nagpur Winter Session : मंत्र्यांच्या कॉटेजमध्ये डासांचा प्रकोप, प्रशासनाची उडवली झोप

मनपाकडून फॉगिंग मशीनची सुविधा
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर : वर्षभरापासून बंद असल्याने रविभवन, नागभवन येथील मंत्र्यांच्या कॉटेजमध्ये डासांचा प्रकोप दिसून येत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉटेजेस नववधूसारखे सजविण्यात आले असले तरी मोठ्या प्रमाणात डासांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. त्यामुळे महापालिकेला डासांसाठी फॉगिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली.

येत्या ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच मंत्रालय नागपुरात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल लाइन परिसरातील रविभवन, नागभवनातील कॉटेजेस, आमदार निवास आदीची रंगरंगोटी व स्वच्छता करण्यात आली. परंतु डासांचा प्रकोप कायम आहे. सायंकाळी डासांमुळे येथे काम करणाऱ्या कामगारांनाही मनस्ताप सहन करावा लागला. महापालिकेवर विधानभवनासाठी संपूर्ण सिव्हिल लाइन परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे. डासांवर नियंत्रणासाठी महापालिकेने फॉगिंग मशीन दिली आहे. विशेषतः रविभवन, नागभवन येथील कॉटेजेमध्ये रात्रीला फॉगिंग करण्यात येणार आहे.

nagpur
Devendra Fadnavis: ‘पनवती’ कोण ते कळलं, देवेंद्र फडणविसांचा कॉंग्रेसला टोला; नागपुरात भाजपचा जल्लोष

याशिवाय महापालिकेच्या घनकचरा विभागाने विधानभवनासह रविभवन, नागभवन, आमदार निवास परिसरात स्वच्छतेसाठी अडीचशे स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले आहे. अडीचशे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये स्वच्छतेची कामे करणार आहे. मंत्र्यांच्या कॉटेजमध्ये त्यांचे कार्यालयही असते. त्यामुळे दिवसभर अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांचीही येथे वर्दळ असते. अनेक कॉटेजमध्ये जेवणाचीही सोय केलेली असते. परिणामी भाजीपाला व किरकोळ कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. रविभवन, नागभवन, आमदार निवासातील कचरा वाहून नेण्यासाठी चार कचरा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मोठे कचरा गोळा करून नेणारे ट्रकही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अडीचशे विशेष सफाई कर्मचाऱ्यांशिवाय नियमित सफाई कर्मचारी रस्ते, फूटपाथ, दुभाजक स्वच्छ करणार असल्याचे मनपातील अधिकाऱ्यांनी नमुद केले.

विधानभवन परिसरात स्वच्छतेसाठी अडीचशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कचरागाडी, कचरा वाहून नेणारे मोठे ट्रकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय डासांच्या खूप तक्रारी असतात. त्यामुळे फॉगिंग मशीनही २४ तास उपलब्ध राहणार आहे.

- डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.