black fungal infection : सर्वाधिक मृत्यू खासगी रुग्णालयात

Mucormycosis
MucormycosisMucormycosis
Updated on

नागपूर : कोरोनाच्या संसर्गानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य (black fungal infection) अर्थात ‘म्युकोरमायकोसिस’ (Mucormycosis) आजाराचे थैमान सुरू झाले आहे. अवघ्या ४० दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात १ हजार ३१० रुग्ण आढळून आले. यापैकी १२३ जणांचा बुरशीने मृत्यू झाला. बुरशीच्या आजाराचे सर्वाधिक ९९ मृत्यू हे खासगी रुग्णालयात (The highest number of 99 deaths was in private hospitals) झालेत. उर्वरित २४ मृत्यू मेयो, मेडिकलसह उतर सरकारी रुग्णालयात झाले आहेत. मंगळवारी (ता. ८) जिल्ह्यात केवळ एक जण दगावला असून ९ जणांना बुरशीची बाधा झाल्याचे पुढे आले. (Most-fungal-deaths-are-in-private-hospitals)

बुरशीच्या आजारांचे ४९३ रुग्ण जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल आहेत. पूर्वी सरकारी रुग्णालयात हे रुग्ण येत नव्हते. मात्र, अलीकडे कोरोनानंतर बऱ्यापैकी बुरशीचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. सद्या ४९३ रुग्णांपैकी २६८ बुरशीचे रुग्ण मेयो, मेडिकलसह सरकारी रुग्णालयात दाखल आहेत, तर उर्वरित २२५ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Mucormycosis
जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

६८२ रुग्णांवर योग्य उपचार झाले. कोरोनासह त्यांनी बुरशीलाही हरवले आहे. याशिवाय नागपूर आरोग्य विभागातील सहा जिल्ह्यांवर नजर टाकल्यास १ हजार ५६१ बुरशीचे रुग्ण आढळले असून यातील १३२ जण दगावले आहेत. यात दगावलेले सर्वाधिक १२३ जण नागपूर जिल्ह्यातील आहेत.

रुग्णालयातील रुग्णांची स्थिती

- खासगीतील रुग्ण ९०२

- मृत्यू - ९९

- सरकारी रुग्ण - ४०८

- मृत्यू - २४

(Most-fungal-deaths-are-in-private-hospitals)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.