महापालिका निवडणूक : भाजप खूश तर काँग्रेसला धक्का; प्रभाग तीनचा

Congress-BJP
Congress-BJPe sakal
Updated on

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी कधी एक तर कधी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीची मागणी करणाऱ्या महाविकासआघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधींनी अखेर तीन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाचा धक्का दिला. या निर्णयाने नागपूरमधील भाजपचे कार्यकर्ते चांगलेच खूश झाले आहे. याऊलच काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे नागपूर महापालिकेत काँग्रेसचा घात झाल्‍याचे काँग्रेसचे म्हणणे होते. भाजपने राजकीय सोयीसाठी चारच प्रभाग केला होता. त्याचा उदंड फायदा भाजपला झाला. सर्वांचा अंदाज चुकवत मागील महापालिकेच्या निवडणुकीत १५१ पैकी भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडणूक आले होते.

Congress-BJP
मुंबईच्या युवकाने भंडाऱ्यातील युवतीवर नागपुरात केला बलात्कार

दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नावालाच उरले. अनेक वर्षे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसचाही दारुण पराभव झाला होता. त्यांचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व बघता बहुसदस्यीय प्रभाग पद्धती बदलण्याची मागणी काँग्रेसमार्फत केली जात होती. महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याची अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार सर्व महापालिकांना प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच निवडणूक होईल असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, आता तसे होणार नाही.

Congress-BJP
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

आघाडीत मतभेद

प्रभाग किती सदस्यांचा करावा याविषयी महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद होते. प्रत्येक नेता आपल्या शहरातील राजकीय सोयीनुसार मागणी करीत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करावी याविषयी आग्रही होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे यास पाठिंबा होता. मात्र, शिवसेनेचा यास विरोध होता असे समजते. शेवटी दोनचा, चारचा न करता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर समझोता झाल्याचे कळते.

निवडणुका लांबणार?

निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार महापालिकेच्या प्रशासनाला कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. दोन सदस्यीय प्रभाग पद्धत केली असती तर एकमेकांना प्रभाग जोडणे तुलनेत सोपे गेले असते. आता तीनच्या प्रभागानुसार नव्याने रचना करावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने रचना करण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. नागपूरसह सर्वच महापालिकांचा कार्यकाळ जवळपास फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()