मुन्ना यादव कुटुंबात राडा, एकमेकांवर हल्ला; धंतोली ठाण्यात दोन्ही गटांत गोंधळ, परिसरात तणाव

भाजपचे नेते आणि कामगार कल्याण महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांची मुले आणि त्यांच्या भावाच्या मुलांमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास मारहाण झाली.
Munna Yadav family attack each other police squad at place to maintain peace nagpur
Munna Yadav family attack each other police squad at place to maintain peace nagpursakal
Updated on

नागपूर : भाजपचे नेते आणि कामगार कल्याण महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांची मुले आणि त्यांच्या भावाच्या मुलांमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास मारहाण झाली. यानंतर या दोन गटातील राडा धंतोली स्थानकात पोहोचला.पोलिस स्थानकात पुन्हा दोन गटात राडा सुरु झाल्याने पोलिस स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जन शनिवारी सायंकाळी घरासमोर उभे होते. यावेळी बाला यादव यांची मुले व त्यांच्या साथीदारांनी करण व अर्जुनवर शस्त्र व काठीने हल्ला केला. यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण सुरू झाली. यात करण आणि अर्जुन दोघेही जखमी झाले.

शिवाय अर्जुनच्या समर्थकांनीही दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने धंतोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जमावाने एमएच ३१ एफ एक्स १७०० व एमएच-४०-एआर-४४५५ या क्रमांकाच्या चारचाकीचीही तोडफोड केली. बातमी वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही गटातील समर्थक व जखमींसह शेकडो कार्यकर्ते धंतोली पोलिस ठाणे गाठले.

दोन्ही गटातील स्थानकातही एकमेकांशी भांडण करण्यात सुरुवात केली. पोलिस स्थानक परिसरातच मारहाण सुरु झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह अतिरिक्त पोलिसांचा ताफा ठाण्यात धडकला. पोलिसांनी जमावाला शांत केले. यादरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.