Kangana Ranaut: "कंगनाचं घर तोडण्यासाठी मविआनं 80 लाख दिले"; CM शिंदेंचा खळबळजनक खुलासा

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले.
Who is Actress Binodini Dasi,whose biopic is doing by kangana Ranaut
Who is Actress Binodini Dasi,whose biopic is doing by kangana RanautGoogle
Updated on

नागपूर : मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीच्या घरावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बुलडोझर चालवण्यात आला होता. या कारवाईसाठी महाविकास आघाडीकडून वकिलाला ८० लाख रुपये देण्यात आले होते, असा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

या अनुषंगानं त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती आरोप केले. (MVA paid 80 lakhs to demolish Kangana Ranaut house says CM Eknath Shinde)

Who is Actress Binodini Dasi,whose biopic is doing by kangana Ranaut
Heeraben Modi Demise: यूपीतील मुस्लीम चित्रकारानं मोदींच्या मातोश्रींना वाहिली अनोखी श्रद्धांजली

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना म्हणाले, "बाळासाहेब आम्हाला कायम म्हणायचे की तुम्ही लढा मी तुमच्या पाठीशी आहे. पण टोमणे सेनेचे नवे प्रवक्ते तुम लढो हम कपडे संभालते है अशी भूमिका घेत होते. पण कंगनाचं घर पाडण्यासाठी मुंबई महापालिकेनं वकिलाला ८० लाख रुपये दिले"

हेही वाचा-जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मुंबईच्या पाली हिल्स भागात कंगनाचं घर आहे, या घराच्या बाहेरच्या बाजुला काही बांधकाम केलेलं होतं. तिथंच कंगनानं आपलं कार्यालय थाटलं होतं. पण नेमका हाच भाग अनधिकृत असल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं त्यावर कारवाई करत थेट बुलडोझरच चालवला होता. पण बांधकाम अनधिकृत नसल्याचा दावा कंगनानं केला होता. यावरुन कंगना आणि शिवसेनेत बरंच घमासान ट्विट युद्ध रंगल होतं. प्रचंड भडकलेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.