नागपूर- कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका अतिशय निर्णायक असल्याने भारतीय संघ कुठलीही संधी सोडायला तयार नाही. त्यामुळे पाहुण्या संघातील फिरकी गोलंदाजीला अचूक उत्तर देण्यासाठी भारतीय संघाने सरावात रणजी करंडकातील चार फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे.
दोन्ही संघ एकमेकांच्या फिरकीचा सामना करण्यासाठी तयारी करीत आहे. येत्या नऊ तारखेपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर पहिला कसोटी सामना होत असून ऑस्ट्रेलिया संघात ४६० बळी घेणारा नॅथन लायन, ॲश्टन ॲगर, नवोदित मिचेल स्वेप्सन, टॉड मर्फी यांचा समावेश आहे.
यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली असून सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर, आर. साई किशोर व राहुल चाहर या फिरकी गोलंदाजांना सरावात पाचारण करण्यात आले. या चौघांनी दिवसभर सरावात भाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय प्रथमच रणजी विजेतेपद मिळविणाऱ्या विदर्भ संघातील मध्यमगती गोलंदाज ललित यादव व रजनीश गुरबानी यांचीही मदत घेण्यात आली.
सौरभ, वॉशिंग्टन सुंदर, साई किशोर व राहुल चाहर यांनी सरावात आळीपाळीने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शुभमन गिल यांना गोलंदाजी केली. जडेजाने आज फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर अधिक भर दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
दरम्यान, बंगळूर येथे सराव करीत असलेला ऑस्ट्रेलिया संघ सोमवारी येथे दाखल होणार असून दाखल होताच ते जामठा येथे सराव करतील. जामठा स्टेडियमवर २००८ मध्ये पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला गेला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया हाच प्रतिस्पर्धी संघ होता.
भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील गावसकर-बॉर्डर करंडकाला १९९६-९७ मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून
१६ उभय संघात मालिका झाल्या.
५२उभय संघात कसोटी सामने झाले.
२२यापैकी भारताचा विजय.
१९ यापैकी ऑस्ट्रेलियाचा विजय.
११सामने अनिर्णित झाले.
आश्विन-
सामने ८८
विकेट ४४९
सरासरी २४.३०
लायन-
सामने ११५
विकेट ४६०
सरासरी ३१.६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.