नागपूर - शहरात महिन्याला दहापेक्षा जास्त अल्पवयीन मुली गर्भपात करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. १५ ते १९ या वयोगटातील गर्भपाताच्या आकडेवारीने विवाहबाह्य, अनैतिक संबंधांचे भयाण वास्तव अधोरेखित केले असून सामाजिक संरचनेला धक्का बसला आहे.
यातील बहुतेक मुलींनी गर्भपातासाठी खाजगी रुग्णालयांची मदत घेतल्याने ही आकडेवारी सुसंस्कृत व श्रीमंत पालकांची चिंता वाढविणारी आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी अधिकृत असून अवैध गर्भपाताची आकडेवारी आणखी मोठी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) केंद्राच्या आकडेवारीवरून शहरातील तरुणाईचे ‘सेक्स लाइफ’च चव्हाट्यावर आले असून संस्कृती, संस्कार अर्थहीन झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षात शहरातील मेडिकलमध्ये १८ वर्षांखालील ११ मुलींच्या प्रसूतीची नोंद आहे.
आता एमटीपीच्या आकडेवारीनुसार मागील २०२२-२३ या वर्षात १५ ते १९ वयोगटातील १२५ मुलींनी गर्भपात केल्याची धक्कादायक बाब पुढे आली. गेल्या वर्षभरात १२ हजार ७४५ महिलांनी जीवाला धोका, मुलाच्या जिवाला धोका, बलात्कार आदी कारणामुळे गर्भपात केला. सुरक्षित गर्भधारणा हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १९७१ मध्ये गर्भपाताबाबत कायदा मंजूर केला.
महिन्याला दहा अल्पवयीन मुली करतात गर्भपात..
यातून गर्भवती महिलेला स्वतःच्या जीवासाठी गर्भपात करता येतो. परंतु अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. दरवर्षी ही आकडेवारी थोडीफार कमी अधिक असते. मात्र, दरवर्षी शंभरावर अल्पवयीन मुली गर्भपात करीत आहेत.
आधुनिक युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने कर्तबगारी दाखवून सन्मान मिळवत असतानाच भावनेच्या आहारी जाऊन शारीरिक संबंधाला बळी पडणाऱ्या तरुणींच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र गर्भपाताच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. (Latest Marathi News)
मागील तीन महिन्यांत ४३ मुलींनी केला गर्भपात
या २०२३-२४ या वर्षात मागील एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये १५ ते १९ वयोगटातील ४३ मुलींनी गर्भपात केल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यातील ३४ गर्भपात खाजगी रुग्णालयांमध्ये करण्यात आले आहेत. यात जूनमध्ये १२ मुलींनी गर्भपात केले.
पंधरा वर्षांखालील मुलींचाही समावेश
‘सोळावं वरीस धोक्याचं’ असे म्हटले जाते. परंतु आता चौदा, पंधरावं वरिसही धोक्याच असल्याचे दिसून येत आहे. मागील २०२२-२३ या वर्षात १५ वर्षांखालील चार मुलींनी गर्भापात केला. आता २०२३-२४ या वर्षात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत १५ वर्षांखालील दोन मुलींनी गर्भापत केला.
शहरातील अनेक औषधी दुकानांमधून गर्भपाताच्या गोळ्या ब्लॅकमध्ये मिळते. मुली या गोळ्या ब्लॅकमध्ये खरेदी करतात. अनेकदा औषधी दुकानदारांना या गोळ्यांचे साईडइफेक्ट माहित नसतात.
अनेकदा या गोळ्यांच्या फायदा न झाल्यास जीवावर बेतण्याची शक्यता असते. मुलींनी गर्भपातासाठी शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भपात करावा. ब्लॅकमध्ये गर्भपाताचे औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांवर अन्न व औषध प्रशानाने कारवाई करण्याची गरज आहे.
- डॉ. सरला लाड, माता व बालसंगोपन अधिकारी, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.