नागपूर विभागाला मिळणार १०० ‘शिवाई’

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसकडे महामंडळाचा कल
100 Shivai electric bus
100 Shivai electric bussakal
Updated on

नागपूर : दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखणे आणि प्रवाशांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी ‘शिवाई’ ही इलेक्ट्रिक बस एसटी महामंडळात नुकतीच दाखल झाली आहे. केवळ पुण्यातच धावणारी ही बस येत्या काळात नागपुरातही धावताना दिसणार आहे. नागपूर विभागात १०० शिवाई लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणारी ‘लालपरी’ने १ जून रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या १ जून या वर्धापनदिनी पुण्यात पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ दाखल झाली. त्यानंतर टप्‍प्याटप्प्याने महाराष्ट्रातील महामंडळाच्या सर्व आगारात ही बस दाखल होणार आहे. याच अंतर्गत येत्या काही महिन्यात नागपूर विभागाला १०० ‘शिवाई’ मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या नागपूर विभागात ४३५ बसगाड्या आहेत. नागपूर प्रदेशातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील आगारात लालपरीची संख्या जास्त आहे. कोरोना आणि नंतर सुरू झालेल्या एसटी महामंडळाच्या संपाने ‘लालपरी’ची चाके जवळपास अडीच वर्षे थांबली होती. त्यामुळे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला. अजूनही स्थिती पूर्वपदावर आली नाही.

‘शिवाई’ बसची वैशिष्ट्ये

  • बसची लांबी १२ मीटर

  • टू बाय टू आसन व्यवस्था,

  • एकूण ४३ आसने

  • ध्वनी व प्रदूषणविरहित,

  • वातानुकूलित गाडी

  • ताशी ८० किमी वेगाने धावणार

  • बॅटरी क्षमता ३२२ केव्ही,

  • इंधनावरील खर्च कमी

  • अपंगांसाठी वेगळा रॅम्प,

  • जीपीएस यंत्रणा

  • सीसीटीव्ही कॅमेरा, आपत्कालीन

  • सूचनेसाठी बटणांची सोय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()