नागपूर : कोरोना विषाणूचे संकट घरात शिरून २० महिने होत आहेत. या विषाणूच्या प्रादूर्भावाने विदर्भच नाही तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाच लाख रुग्णसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. अशातच डेंगीच्या डासांचा उच्छादही वाढला आहे. डेंगी डासांचे डंख वाढले आहेत. जिल्ह्यात २ हजार २१३१ डेंगीग्रस्तांची नोंद झाली तर १० जणांचा मृत्यू झाला. पूर्व विदर्भात डेंगीने १७ जणांचा मृत्यू झाला. १० महिन्यात डेंगीग्रस्तांची संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली.
नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२० मध्ये ३९० डेंगीग्रस्त आढळले. मात्र कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये डेंगीग्रस्तांची संख्या आठपटीने वाढली. १० महिन्यात ३ हजार ४०५ डेंगीग्रस्त आढळले.
यामुळे आरोग्य उपसंचालक कार्यालय हादरले. डेंगीग्रस्तांची रुग्णसंख्या वाढली असूनही फवारणीसह नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता तिसऱ्या लाटेकडे डोळे लागले आहेत. या आठवड्यापासून डेंगीचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत, असा दावा आरोग्यसेवा विभागाच्या मलेरिया विभागाने केला.
नागपूर विभाग
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२० - ३९० डेंगीग्रस्त
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ - ३४०५ डेंगीग्रस्त
जिल्हा सन २०२० - सन २०२१
-नागपूर शहर - ८२ - ९१५
-नागपूर ग्रामीण - ३९ - १२१६
-भंडारा - ८ - ५४
-गोंदिया - ४ - १७७
-चंद्रपूर -१७४ - ५७२
-गडचिरोली - १४ - ६५
-वर्धा - ६९ - ४०६
डेंगीच्या मृत्यूमध्ये वाढ
नागपूर विभागातील १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१९ या काळात १० रुग्ण डेंगीने दगावले. २०२० मध्ये केवळ २ डेंगीग्रस्तांचा मृत्यू झाला होता. मात्र, २०२१ मध्ये १० महिन्यात विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये तब्बल १७ डेंगीचे मृत्यू नोंदवले गेले. यापैकी सर्वाधिक १० मृत्यू नागपूर जिल्ह्यात, भंडाऱ्यात १, चंद्रपूरला ४, वर्धेत २ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.