नागपूर : काटोल, नरखेडसाठी ५४ नवीन रेशन दुकाने मंजूर

राशन दुकान नसल्याने अनेक नागरिकांना दुसऱ्या गावात राशन घेण्यासाठी जावे लागत
Nagpur 54 new ration shops sanctioned for Katol Narkhed
Nagpur 54 new ration shops sanctioned for Katol Narkhedsakal
Updated on

काटोल - काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये राशन दुकाने नव्हती. यामुळे नागरिकांना दुसऱ्या गावात जाऊन धान्य घ्यावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता नवीन दुकाने मंजूर करण्यासाठी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता. याचा पाठपुरावा करून काटोल व नरखेड तालुक्यात एकूण ५४ नवीन रेशन दुकाने मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जि.प.सदस्य सलिल देशमुख यांनी दिली.

गावात राशन दुकान नसल्याने अनेक नागरिकांना दुसऱ्या गावात जावून राशन घेण्यासाठी जावे लागत होते. यात त्यांचा बराच वेळ वाया जात तर होताच परत त्रास सुध्दा होत होता. यामुळे नागरिकांनी आमच्याच गावात राशन दुकान मंजूर करण्यासाठी मोठया प्रमाणात मागणी होत होती. कोणत्या गावात राशन दुकाने नाहीत, याची संपूर्ण माहिती तयार करुन तसा प्रस्ताव अनिल देशमुख यांनी शासनदरबारी सादर केला होता. नागरिकांची अडचण लक्षात घेता देशमुख यांनी सुध्दा मंत्रालय स्तरावर या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने त्यांनी बैठकी घेतल्या होत्या. त्यांनतर काटोल व नरखेडसाठी ५४ राशन दुकाने मंजूर करण्यात आली. आता याचे जाहीरनामे निघाले असून २९ जुलैपर्यंत यासाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख असल्याचेही सलिल देशमुख यांनी सांगितले.

कोणती ‘ती़’ ५४ गावे?

काटोल तालुक्यात पठार, वडविहीरा, वाघोडा, चिचाळा, पंचमवाडी, पांढरढाकणी, कोल्हू, चौरेपठार, सावळी बु., कारला, गोल्हारखापा, मुकनी, ताराबोडी, लाखोळी, वाजबोडी, कलमुंडा, शेकापूर, खापा, तरोडा, बिलावरगोंदी, धामणगाव, मुरली, वसंतनगर, मलकापूर, भाजीपाणी, बोरडोह, हरणखुरी, बोरगोंदी, अहमदनगर, गणेशपूर, कुंडी, कुकडीपांजरा, हरदोली, गोडीमोहगाव, कोंढाळी, गुजरखेडी या गावांचा तर नरखेड तालुक्यातील खारगड, लोहारा, गुमगाव, पिठोरी, बानोर, जुनोना फुके, मालापूर, बानोरचंद्र, दिंदरगाव, जुनोना घारड, नारसिंगी, जोलवाडी, खेडी खू., नांदा शिंदे, वडविहीरा, गोंडेगाव, देवळी या गावांचा समावेश आहे. या संदर्भात सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विहीत अर्ज सादर करावे व अधिक माहितीसाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी काटोल उपविभाग श्री कमलेश कुंभरे यांच्यासोबत संर्पक करावा, अशी माहितीही सलिल देशमुख यांनी दिली.

महिला बचत गटांना प्राधान्य

अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असताना अनिल देशमुख यांना एैतिहासिक निर्णय घेत राज्यातील सर्व नवीन राशन दुकाने हे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयानुसार काटोल व नरखेड तालुक्यातील मंजूर ही ५४ राशन दुकाने देण्यासाठी महिला बचत गटांना प्राधन्य देण्यात येणार आहे. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी संस्था यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सलिल देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.