नागपूर : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी आज दुपारच्या सुमारास अचानकपणे शिक्षण विभागाला भेट देत झाडाझडती घेतली. यावेळी त्यांना ९० टक्के अधिकारी, कर्मचारी गैरहजर दिसले. यावर त्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. गैरहजर कर्मचाऱ्यांना कक्षात बोलावून चांगलीच कान उघाडणी केली.
कार्यालयात कर्मचारी नसल्याने शिक्षण विभागात कामाला येणाऱ्यांची आल्यापावली परत जावे लागले. दुपारच्या सुमारास काही शिक्षक उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्याकडे आले. त्यांच्या कार्यालयाकडून शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. शिक्षणाधिकारी प्रशिक्षणासाठी बाहेर होत्या. तर इतर अधिकाऱ्यांचे फोनच लागले नाही. काहींसोबत संपर्क झाला असता ते बाहेर असल्याचे कळाले. त्यामुळे त्यांनी थेट शिक्षण विभाग गाठले. अचानकपणे उपाध्यक्ष आल्याने उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली.
कार्यालयात बोटाबर बोजण्याइतकेही कर्मचारी उपस्थित नव्हते. कार्यालयातील स्थिती पाहून त्या चांगल्याच संतापल्या. उपस्थितांनाही त्यांनी फैलावर घेतल्याची माहिती आहे. हजरेपटावर उपस्थिती दर्शवून गैरहजर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना त्यांनी कक्षात बोलावून घेतले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्यांच्या मुलींचे लग्न होते. या लग्नात सहभागी होण्यासाठी कर्मचारी गेले असल्याची माहिती समोर आली. परंतु कार्यालयच ओस असल्याने सामान्य नागरिकांची चांगलीच अडचण झाली. अनेकांना आल्या पावली परतावे लागले. यावर उपाध्यक्षांना नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.