Nagpur Accident: नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू

accident
accident sakal
Updated on

नागभीड: नागपूरवरून नागभीडकडे वेगाने जाणाऱ्या कारने खासगी बसला समोरून धडक दिली. या अपघातात चौघांचा जागीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास नागभीड-नागपूर मार्गावरील कान्पा गावाजवळ घडली.

मृतांत रोहन विजय राऊत (वय ३०), ऋषिकेश विजय राऊत (वय २८), गीता विजय राऊत (वय ५०), सुनीता रूपेश फेंडर (वय ४०), प्रभा शेखर सोनवणे (वय ३५, लाखनी जि. भंडारा) आणि यामिनी फेंडर (वय ९, रा. नागपूर ) यांचा समावेश आहे.

मृतातील तीन जण एकाच कुटुंबातील आहे. ते नागपुरातील चंदननगर, गांधी क्रीडा मैदान परिसरात राहणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार रोहन राऊत हे गेल्या वर्षभरापासून पत्नीपासून विभक्त राहत होते. त्यांची पत्नी ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही या गावात मुलासोबत राहते.

accident
lok sabha 2024: रिटायर शिंदे पुन्हा मैदानात! सोलापूर लोकसभेचे सर्वाधिकार सुशीलकुमार शिंदेंकडे

पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी राऊत कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक शेजारी राहत असलेले रोशन तागडे यांच्या एमएच ४९ बीआर २२४२ क्रमांकाच्या अल्टो कारने रविवारी ब्रह्मपुरीसाठी निघाले. नागभीडजवळच्या कान्पा गावाजवळ एमएच- ३३ टी २६७७ या क्रमांकाच्या खासगी बसवर वेगाने जाणारी अल्टो धडकली.

यात रोहन विजय राऊत, ऋषिकेश विजय राऊत, गीता विजय राऊत आणि सुनीता रूपेश फेंडर जागीच ठार झाले. प्रभा शेखर सोनवाणे आणि यामिनी फेंडर गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गंभीर जखमींना तातडीने नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.

उपचारादरम्यान प्रभा शेखर सोनवाणे यांचा मृत्यू झाला, तर यामिनी फेंडरे हिला नागपूरला नेत असतानाच वाटेत तिचाही मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी खासगी बसचालक राजेंद्र लाकडू वैरकर याला ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली.

accident
Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाला हव्यात २२ जागा ; कोणतीही मागणी नसल्याचा फडणवीसांचा दावा

कारचे दरवाजे तोडून काढले मृतदेह

अपघातानंतर कान्पा गावाजवळ असलेल्या बारमधील काही कर्मचाऱ्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. गाडी चक्काचूर झाली होती.

मृतदेह काढण्याचे प्रयत्न पोलिस आणि गावकऱ्यांनी केले. मात्र, ते निघाले नाही. शेवटी सबलीने कारचे दरवाजे तोडून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

वाहन क्रमांकाने लागला शोध

या भीषण अपघातात कार चक्काचूर झाली. मृतांकडे असलेले मोबाईलही तुटले. त्यामुळे त्यांचा मृतांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. त्यांनी तातडीने वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे वाहनमालकाचा शोध घेतला. हे वाहन नागपुरातील रोशन तागडे यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले.

त्यांच्याशी पोलिसांनी तातडीने संपर्क साधला. गाडी आपलीच असल्याचे सांगितल्यावर अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर तागडे आणि मृताची एक आत्या तातडीने नागभीड येथे दाखल झाले. त्यानंतर मृतांची ओळख पटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.