Eco Friendly Cemetary: दहन घाटांवर लागणार वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली! वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची पाऊले

शहरातील वायू प्रदूषण चिंतेचा विषय ठरल्याने महापालिकेने सर्वाधिक प्रदूषणाची नोंद असलेल्या व नागरी वस्त्यांसह घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला.याबाबत निविदा काढण्यात आली.
Eco Friendly Cemetary: दहन घाटांवर लागणार वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली! वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची पाऊले
Updated on

Air Pollution Control System at Cemetary: शहरातील वायू प्रदूषण चिंतेचा विषय ठरल्याने महापालिकेने सर्वाधिक प्रदूषणाची नोंद असलेल्या व नागरी वस्त्यांसह घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला.याबाबत निविदा काढण्यात आली.

शहरातील प्रदूषणाची उच्च न्यायालयानेही दखल घेत दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पाऊले उचलली आहेत. यासाठी बांधकामाच्या ठिकाणी वारंवार पाण्याची फवारणी करण्याबाबत सोशल मिडियावरून आवाहन केले आहे.

एवढेच नव्हे महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकताच एक बैठक घेऊन मनपासह वाहतूक पोलिस, केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी या सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश दिले. याशिवाय रस्त्यांवरील खड्डे बुजवून त्याचे समतलीकरण आणि पर्यावरणपूरक दहन घाटांच्या विकासासाठी कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेत. (Latest Marathi News)

सर्वाधिक प्रदूषणाची नोंद असलेल्या वस्त्यांना लागून असलेल्या गंगाबाई घाट, मोक्षधाम घाट आणि मानेवाडा या दहन घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्याबाबत निविदा काढली आहे. जयताळा, चिंचभुवन आणि फ्रेन्ड्स कॉलनी येथील दहनघाट विकासकामांना गती दिली आहे.

Eco Friendly Cemetary: दहन घाटांवर लागणार वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली! वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची पाऊले
Ayesha Takia: "देशात इतर कोणतेही महत्त्वाचे मुद्दे नाहीयेत का?";लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकीयाचं सणसणीत उत्तर

वायू गुणवत्ता सुधारणा आणि बळकटीकरणासाठी महानगरपालिकेने सीएसआयआर-नीरीचे सहकार्य घेतले आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मनपा, वाहतूक पोलिस, नीरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे.

प्रदूषण राेखण्याच्या इतर पर्यायांवरही भर

प्रदूषण रोखण्यासाठी १४४ नवीन ई-बसेससाठी कार्यादेश देण्यात आला आहे. सध्या ६० ई-बसेस सेवेत आहेत. वाडी, हिंगणा आणि लकडगंज येथील चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोचे काम पूर्ण झाले असून वाठोडा बस डेपोचे काम सुरू आहे. (Latest Marathi News)

शहरात हरीत क्षेत्राच्या विकासासाठी उद्यान विभागाद्वारे विविध कामे सुरू करण्यात आली आहे. यातील भारत माता उद्यानामध्ये हरीत क्षेत्र विकसित करण्यात आलेले आहे. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.

Eco Friendly Cemetary: दहन घाटांवर लागणार वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली! वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची पाऊले
Raj Thackeray and Ashish Shelar Meet: आशिष शेलारांसोबतच्या बैठकीत काय घडलं? राज ठाकरेंनी एका ओळीत संपवला विषय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.