Nagpur News : नागपुरातील विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या कामाला लवकरच आरंभ - फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस ; विदर्भ आयटी कॉनक्लेव्हचे उद्‍घाटन
Devendra fadnavis
Devendra fadnavise sakal
Updated on

नागपूर : नागपुरातील विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यात दोन धावपट्ट्या आणि देखणे पॅसेंजर आणि कार्गो टर्मिनल असेल. ''आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हब'' नागपुरात झाल्यास शासनाचा पाठिंबा असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

सीआयआयतर्फे ''विदर्भ आयटी कॉनक्लेव्ह''चे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्थेत आयोजित परिषदेत बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष डॅा. नंदकुमार उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली आहे. महाराष्ट्राने जीएसटी संकलनात अव्वल स्थान गाठले आहे. २.७ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन यंदा राज्यात झाले आहे. देशाच्या एकूण संकलनात हे प्रमाण १५ टक्के आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॅालर्सपर्यंत विकसित करण्याचे ठरविले आहे. हे ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचाही वाटा असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्याची अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.

या समितीत प्रसिद्ध उद्योजकांचा समावेश आहे. ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास कसे नेता येईल, यासाठी सर्वांगाने प्रयत्न करण्यात येत आहे. फाइव्ह ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे.

जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा बदल शक्य झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्योगांसाठी नागपूर हे आदर्श ठिकाण ः गडकरी

वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात देशातील नामवंत कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. इतर सर्व उद्योगांसह आयटी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांही नागपूरकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे देशाच्या ह्रदयस्थानी असलेले शहर आता उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण ठरत आहे.

नागपूर हे झिरो माईल आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांना सारख्या अंतराने जोडले गेलेले शहर आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वास आल्यानंतर आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()