Nagpur News : अंबाळा तलावाजवळील वास्तूंचा जीर्णोद्धार; ७३ तीर्थस्थळांचा करणार कायापालट

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाकडे हजारो भाविकांचे लक्ष लागलेले असताना राज्यातील भाविकांना शासनाने आनंदवार्ता दिली.
Ambala Lake
Ambala Lakesakal
Updated on

नागपूर - अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाकडे हजारो भाविकांचे लक्ष लागलेले असताना राज्यातील भाविकांना शासनाने आनंदवार्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाने ‘नमो तीर्थस्थळ सुधार अभियान’ हाती घेतले आहे. याद्वारे, राज्यातील ७३ तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार केला जात असून यामध्ये रामटेक (जि. नागपूर) येथील अंबाळा तलाव व‌ परिसरातील पुरातन वास्तूंचा समावेश आहे.

अंबाळा तलाव परिसर निसर्गरम्य वातावरणात असून तलावाच्या शेजारी काही ऐतिहासिक स्मारके आढळतात. या वास्तू भोसलेकालीन असल्याचे सांगण्यात येते. एका आख्यायिकेनुसार भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्‍यपु यांच्यात झालेले युद्ध हे याच अंबाळा तलाव परिसरात झाल्याचे सांगितले जात.

अंबाळा तलावाजवळील वास्तूंचा जीर्णोद्धार

त्यामुळे, सांस्कृतिक दृष्टीकोनासह आध्यात्मिक दृष्ट्यासुद्धा या स्थळांना महत्त्व आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये संचालनालयामार्फत हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यात रामटेक येथील या परिसराचा समावेश आहे. संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या नागपूर विभागातील ९ तीर्थस्थळांचा राहतील.

तर, सर्वाधीक १७ वास्तू नाशिक विभागातील असून विदर्भातील सर्वाधीक स्थळ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. नियमीत योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे.

Ambala Lake
Grampanchyat Election Result : नागपूर जिल्ह्यात भाजप २३८, काँग्रेस १३७, राष्ट्रवादी ८४, अजित पवार, शिंदे सेनेनेही खाते उघडले

विदर्भातील या वास्तूंचा समावेश

* अंबाळा तलाव परिसरातील मंदिरे, (ता. रामटेक, जि. नागपूर)

* कालभैरव मंदिर, नागरा (ता. जि. गोंदिया)

* महादेव मंदिर, भटाळा (ता. राजुरा, जि. चंद्रपूर)

* विष्णू मंदिर, माणिकगड (ता. जिवती, जि. चंद्रपूर)

* भवानी मंदिर, भटाळा (ता. राजुरा, जि. चंद्रपूर)

* ॠषी तलाव भटाळा (जि. चंद्रपूर)

* महादेव मंदिर, बाबुपेठ, चंद्रपूर

* सोमेश्वर मंदिर, राजुरा (ता. राजुरा, जि.चंद्रपूर)

* शंकर मंदिर, भिसी (चिमूर, जि. चंद्रपूर)

परिसराचे सुशोभीकरण

राज्यातील या ७३ तीर्थस्थळांमध्ये ऐतिहासिक व पुरातन मंदिरांसह बारव, तलाव, स्मारकांचा देखील समावेश आहे. तसेच, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभीकरण व स्वच्छता या बाबीचासुद्धा या कामात अंतर्भाव असणार आहे.

केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार हा दृष्टिकोन न ठेवता पर्यटन आणि स्थानिक नागरिकांच्या सुविधा देखील या उपक्रमात डोळ्या समोर ठेवण्यात आल्या आहेत. यात नागरिकांसाठी प्राथमिक सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असून सुलभ इंटरनॅशनलसोबत ३० वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

- अमोल गोटे, सहाय्यक संचालक, पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.