Nagpur-Amravati Road: दिशादर्शक फलकच करतात वाहनचालकांची ‘दिशाभूल’, चुकीच्या ठिकाणी लावले फलक;नवीन चालकांची उडते तारांबळ

नागपूर-अमरावती बाह्यवळण मार्गावरून गुमगाव गावाकडे जाणारा रस्ता दर्शविणारा फलकच चक्क चुकीच्या ठिकाणी लावल्याने गोंधळलेल्या नवीन वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.
Nagpur
NagpurEsakal
Updated on

Wrong Sign Board on National Highway: कोणता रस्ता कोणत्या गावी जातो, याची माहिती व्हावी याकरिता रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येते.ही जबाबदारी रस्ता बांधकाम विभागांतर्गत पार पाडावी लागते. परंतु, नागपूर-अमरावती बाह्यवळण मार्गावरून गुमगाव गावाकडे जाणारा रस्ता दर्शविणारा फलकच चक्क चुकीच्या ठिकाणी लावल्याने गोंधळलेल्या नवीन वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. गावाची वाट चुकलेले वाहनचालक, नातेवाईक गावकऱ्यांना फोन करून योग्य रस्ता विचारताना ''आरं, गाव शोधताना डोकं फिरतंय'' अशी प्रतिक्रिया देत आहेत.

बहुसंख्य प्रवासी हे एखाद्या गावात दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने जाण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेले गावाचे नाव आणि दिशादर्शक फलकांचा वापर करतात. परंतु, नागपूर बाह्यवळण मार्गावरून समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याहून गुमगावकडे जाणारा रस्ता दर्शविणारा दिशादर्शक फलकच चक्क वाहनचालकांची दिशाभूल करीत आहे.

या परिसरातील जे वाहनचालक आहेत, त्यांना या मार्गाची माहिती असल्याने त्यांची अडचण होत नाही.यात नवीन वाहन चालक आल्यास त्यांना या रस्त्याची माहिती नसल्याने त्यांची अडचण होते. दिशादर्शक फलकावरून नवीन वाहनचालक गुमगावला न जाता नजीकच्या वृंदावन सिटीमध्ये पोहोचतात.तिथे त्यांना रस्ता विचारून परत येत दुसरा रस्ता पकडावा लागत असल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. यामुळे गुमगावचा रस्ता दर्शविणारा दिशादर्शक फलक योग्य जागी लावण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.(Latest marathi news)

चालकांना अडचणींचा फेरा

दिशादर्शक फलकच नवीन वाहनचालकांची दिशाभूल करीत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा फेरा मारावा लागत आहे.यातही येथे गावातील व्यक्ती आढळल्यास सहज सोपे जाते. पण,कोणी गावाचा जाणकार व्यक्ती नसल्यास गावाकडे जाणारा रस्ता कोणाला विचारावा असा प्रश्न नवीन वाहनचालकांना पडतो.

Nagpur
Fact Check GT vs MI : पांड्या-रोहितच्या फॅनमध्ये झाली हाणामारी? काय आहे Viral Video मागील सत्य?

'स्पेलिंग' ही चुकीचे

रस्ता बांधकाम विभागाने गावाकडे जाणारा दिशादर्शक फलक चुकीच्या जागेवर लावल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहेच.इंग्रजीचे सात मुळाक्षरे असणाऱ्या गावाच्या नावातही ''स्पेलिंग'' चुकीचे लिहिल्याने डोक्यावर हात मारावे लागत आहे. (Latest marathi news)

Nagpur
Lok Sabha Elections 2024: कंगणाला होणार घराणेशाहीचा फायदा? पणजोबा होते काँग्रेसचे आमदार अन् नातीने मिळवले भाजपचे तिकीट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.