Nagpur Code of Conduct: आचारसंहिता लागू होताच गृहविभाग अ‍ॅक्शन मोडवर, परवानाधारकांची शस्त्रे होतील जमा

कायदा व सुव्यवस्थेचा विषय लक्षात घेऊन शहर आणि ग्रामीण भागात परवाना शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश आहेत.
Amravati News
Amravati News Esakal
Updated on

Amravati Code of Conduct Licensed Guns Seized: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आयोगाच्या सुचनेनुसार गृहविभागाने आपली मोहीम सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विषय लक्षात घेऊन शहर आणि ग्रामीण भागात परवाना शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश आहेत.

शहराध्ये जवळपास ३७७ तर ग्रामीण भागात ३६६ शस्त्र परवानाधारक आहेत. हे सर्व शस्त्रे फायर आर्मच्या कक्षेत मोडतात. आचारसंहिता संपेपर्यंत सदर शस्त्रे ही पोलिसांकडे जमा करावी लागतात. आचारसंहितेच्या काळात शस्त्र परवाना धारकांकडून शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

त्यामुळे आयुक्तालय व ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीने शहरात पोलिस आयुक्तांनी तसे आदेश शहरासाठी जारी केले आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे वाहून नेण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.(Latest Marathi News)

सदर मनाई आदेश जो समाज दीर्घकालीन स्थायी कायदा, रुढी व परंपरेने शस्त्रास्त्रे बाळगण्यास हकदार आहे, त्या समाजाला लागू होणार नाही. तथापि अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांची शस्त्रास्त्रे जप्तीचा पोलिस विभागाला अधिकार राहील.

Amravati News
मागील तारखा टाकून विकासकामांना वर्क ऑर्डर? जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कामांची यादी संशयाच्या भोवऱ्यात; सीईओ तपासणार मंजुरी आदेश

तसेच अपवादात्मक परिस्थितीत शस्त्रे जमा करण्यापासून सूट मिळण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यामार्फत पुनर्विलोकन समितीकडे अर्ज करण्याची परवाना धारकांना मुभा राहील. तसेच जो कुणी या नियमांचे उल्लंघन करील तो इसम तथा परवानाधारक दंडनीय कारवाईस पात्र ठरेल, असे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

Amravati News
Weather Update: विदर्भात अवकाळी पावसासह गारपीट; आजही 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.