Nagpur Ancient Gold Coins Fraud: खोदकामात सोन्याचे नाणे मिळाल्याची थाप मारून अज्ञात आरोपीने चायनीज ठेला चालकाची दीड लाख रुपयांनी फसवणूक केली. सोनाराकडे नेऊन तपासल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी तहसील पोलिसांनी राजू रामाधार वर्मा (३९ रा. मिनीमातानगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
मोमीनपुरा येथील गार्डलाईन मार्गावर राजू चायनीजचा ठेला लावतात. ४ फेब्रुवारीला दुपारी त्यांच्या दुकानात एक व्यक्ती आला. त्याने खोदकामादरम्यान एक माठ मिळाला असून त्यात सोन्याचे सिक्के असल्याची बतावणी केली. तसेच ते सिक्के राजू यांना स्वस्तात विकण्याचे आमिष दाखविले. स्वस्त किंमतीत सोने मिळत असल्यामुळे राजू यांनी खरेदी करण्याची तयारी दर्शविली. (Latest Marathi News)
दीड लाख रुपयांची व्यवस्था करून आरोपीकडून सोन्याचे चार सिक्के खरेदी केले. सराफाकडे नेऊन ते सिक्के तपासले असता बनावट असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे समजताच राजू यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.