Nagpur Apple : मोबाईल शॉपीमध्ये आढळले बनावट आयफोन;८७ लाख ५९ हजाराचा माल जप्त

बनावट आय फोन मोबाईल, चार्जर, ॲडाप्टर, यूएसबी केबल, ईअर पॉड, आय पॅड केस कव्हर, मॅक बुक, व मोबाईल कव्हरची विक्री केली .
IPhone
IPhoneSakal
Updated on

Nagpur : ॲपल कंपनीचे मोबाईल फोन आणि इतर बनावट साहित्याची विक्री करणारा मोदी क्रमांक. ३ मधील चार मोबाईल शॉपीवर सीताबर्डी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी ८७ लाख ५९ हजाराचा माल जप्त केला. ही कामगिरी मंगळवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अजय शीतलदास माखिजानी (वय ४३, रा. जरीपटका), भूषण राधाकिशन गेहानी (वय ५२, सेतीया चौक, जरीपटका) आणि मनोज रमेशलाल धनराजानी (वय ४९, रा. कुंभ कॉलोनी, जरीपटका), साहिल विनोदकुमार बजाज (वय २१, रा. दयानंदपार्क जवळ, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहे.

IPhone
D-Gang : ‘डी-गॅंग’शी अनंत जैनचा संबंध?

सीताबार्डीतील मोदी क्रमांक ३ मध्ये अजय याचे व्हाईट हाऊसस भूषण याते श्री गणेश मोबाईल, मनोज याचे प्रथमेश तर साहिल याचे लक्ष्मीनारायण मोबाईल या नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात ॲपल कंपनी या नावाने बनावट आय फोन मोबाईल, चार्जर, ॲडाप्टर, यूएसबी केबल, ईअर पॉड, आय पॅड केस कव्हर, मॅक बुक, व मोबाईल कव्हरची विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

IPhone
Satara : महापुरुषांची बदनामी करण्‍याचं धाडस होतंच कसं? अशा अपप्रवृत्ती ठेचल्‍याच पाहिजेत; उदयनराजेंचा कोणाला इशारा?

त्यांनी या प्रकरणाची चौकशी करीत, त्याबाबत कंपनीचे अधिकारी यशवंत शिवाजी मोहिते (वय ४२,रा. सेक्टर २१, नेरूळ, नवी मुंबई) यांनी सीताबर्डी पोलिसांना तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिस उपायुक्त राहूल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेन्द्र हिवरे, पोलिस निरीक्षक गेडाम, सहायक पोलिस निरीक्षक संतोष कदम, पोलिस उपनिरीक्षक विनोद तिवारी, पोलिस हवालदार चंद्रशेखर, अंमलदार आबा मुंडे, प्रितम, धीरज यांनी चारही मोबाईल शॉपीवर छापा टाकला.

IPhone
IPS Saurabh Tripathi : अंगडीया खंडणी प्रकरणात विवादास्पद ठरलेले, IPS सौरभ त्रिपाठींची राज्य पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागात वर्णी

यावेळी अजयच्या दुकानातून ४३ लाख ४७ हजार १०० रुपयाचा बनावट माल, भूषणच्या शॉपीतून ५ लाख ९० हजार ३०० रुपयाचा माल, मनोजच्या शॉपीतून १४ लाख ७८ हजार ६०० तर साहिलच्या दुकानातून २३ लाख ४३ हजार असा एकूण ८७ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी पोलिसांनी चौघांवरही गुन्हा दाखल करीत, कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.